Sharath Kamal Achanta Dainik Gomantak
क्रीडा

National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमलची मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

या वर्षातील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी विविध कॅटेगरीतील पुरस्कारांची घोषणा केली. टेनिसपटू अचंत शरथ कमलला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जाहीर केलेल्या यादीत एकाही क्रिकेटपटुचं नाव नाही. पण, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड  यांची द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते 30 नोव्हेंबरला पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. 

जवळपास दोन दशके आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळत असलेल्या स्टार टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याची देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी (Major Dhyan Chand Khel Ratna Award) निवड करण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 समारंभात त्याचा या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. अचंत शरथ कमल हे टेबल टेनिसमधील एक मोठं नाव. त्यानं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकं (एकूण सात सुवर्णपदकं) जिंकली आहेत.

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने 14 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या यादीत अर्जुन पुरस्कारासाठी (Arjun Award 2022) 25 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या यादीत बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन, एल्डोस पॉल, अविनाश साबळे, बॉक्सर निखत जरीन यांसारख्या स्टार्स खेळाडूंचा समावेश आहे. यासोबतच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सात प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनाही द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करतील.

मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार: अचंत शरत कमल

'या' खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचा सन्मान

सीमा पुनिया (अॅथलेटिक्स),

एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स),

अविनाश मुकुंद साबले (अॅथलेटिक्स),

लक्ष्य सेन (बॅडमिंटन),

एचएस प्रणय (बॅडमिंटन),

अमित (बॉक्सिंग),

निकहत जरीन ( बॉक्सिंग),

भक्ति प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ),

आर प्रज्ञानानंद (बुद्धिबळ),

दीप ग्रेस एक्का (हॉकी),

सुशीला देवी (जूडो),

साक्षी कुमारी (कबड्डी),

नयन मोनी सैकिया (लॉन बॉल),

सागर कैलास ओवलकर (मल्लखांब),

इलावेनिल वलारिवन (शूटिंग),

ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग),

श्रीजा अकुला (टेबल टेनिस),

विकास ठाकुर (वेट लिफ्टिंग),

अंशु (कुस्ती), सरिता (कुस्ती),

परवीन (वुशु),

मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन),

तरुण ढिल्लन (पॅरा बॅडमिंटन),

स्वप्निल संजय पाटिल (पॅरा स्विमिंग),

जेरलिन अनिका जे (डेफ बॅडमिंटन).

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी प्रशिक्षकांसाठी):

जीवनजोत सिंह तेजा (नेमबाजी),

मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग),

सुमा सिद्धार्थ शिरूर (पॅरा शूटिंग),

सुजीत मान (कुस्ती).

द्रोणाचार्य पुरस्कार (लाईफटाईम कॅटेगरी):

दिनेश जवाहर लाड (क्रिकेट),

बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल),

राज सिंह (कुस्ती).

खेळांमध्ये लाईफटाईम कॅटेगरीत अचीव्हमेंटसाठी ध्यानचंद पुरस्कार:

अश्विनी अकुंजी सी (अॅथलेटिक्स),

धर्मवीर सिंह (हॉकी),

बीसी सुरेश (कबड्डी),

नीर बहादुर गुरुंग (पॅरा अॅथलेटिक्स).

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2022

ट्रांस स्टेडिया इंटरप्रायजेस प्रायवेट लिमिटेड,

कलिंगा सूचना प्रौद्योगिकी संस्थान, लद्दाख स्की आणि स्नोबोर्ड संघ

मौलाना अबुल कलाम आझाद (MACA) ट्रॉफी

गुरु नानक देव विश्वविद्यालय, अमृतसर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT