National Games 2022 Dainik Gomantak
क्रीडा

National Games 2022: नॅशनल गेम्समध्ये 10 वर्षीय शौर्यजीतची सर्वत्र चर्चा, PM Modi ही झाले फॅन

National Games 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये झालेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळांमधील व्हिडिओ शेअर करून 10 वर्षीय शौर्यजितचे कौतुक केले.

दैनिक गोमन्तक

गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36व्या राष्ट्रीय खेळांमध्ये 10 वर्षीय शौर्यजितची सर्वत्र चर्चा होत आहे. शौर्यजितने मलखांबवर असा पराक्रम दाखवला की सगळेच त्यांचे फॅन झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत शौर्यजितचे कौतुक केले आहे.

पीएम मोदींच्या (PM Modi) शेअर व्हिडिओमध्ये शौर्यजित मल्लखांब करताना दिसत आहेत. गुजरातची (Gujrat) माहिती रिट्विट करत पंतप्रधानांनी लिहिले, शौर्यजित एक स्टार आहे. त्याचवेळी गुजरात इन्फॉर्मेशनने ट्विट करून लिहिले की, शौर्यजित हा नॅशनल गेम्समध्ये (National Games) सहभागी होणारा सर्वात तरुण मल्लखांब खेळाडू आहे. 

माझ्या वडिलांचे स्वप्न होते की... - शौर्यजित

शौर्यजित हा मूळचा गुजरातचा असून, 30 सप्‍टेंबरला म्हणजेच खेळ सुरू झाल्‍यानंतर काही दिवसांनी त्‍याने वडिलांना गमावले. असे असूनही त्याचे मन डगमगले नाही आणि त्याने यात सहभागी होऊन चमकदार कामगिरी केली. शौर्यजितने आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवावे.

शौर्यजितने मोठा पराक्रम दाखवला

खरे तर शौरजीतने आपल्या पराक्रमाने सर्वांची मने जिंकली. प्रथम जिम्नॅस्टिक आणि कयाकची पोझ दिली, नंतर खांबावर चढून आश्चर्यकारक पराक्रम केले. यादरम्यान कधी तो खांबावर चढायचा तर कधी खांबाचा आधार घेऊन पोझ देत असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली; लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार काय टाकणार डाव?

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT