Mumbai Indians IPL 2026 Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: मुंबई इंडियन्सचा 'विजयी शंखनाद'; रोहित, हार्दिक आणि सूर्या एकाच मंचावर, सहाव्या ट्रॉफीसाठी शड्डू ठोकला!

Mumbai Indians IPL 2026: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने (MI) मैदानाबाहेर बाजी मारली आहे.

Sameer Amunekar

मुंबई: आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने (MI) मैदानाबाहेर बाजी मारली आहे. मुंबई इंडियन्सने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात भारतीय क्रिकेटचे तीन मोठे आधारस्तंभ – रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव – एकाच मंचावर एकत्र दिसले. या तिघांच्या एकत्र येण्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, संघात सर्व काही आलबेल असल्याचे संकेत मिळाले आहेत. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, 'पलटण' आता सहाव्या जेतेपदासाठी सज्ज झाली आहे.

कार्यक्रमादरम्यान कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव मंचावर असताना त्यांनी स्वतः माईकवरून रोहित शर्माचे नाव पुकारले आणि त्याला स्टेजवर बोलावले. रोहितचे आगमन होताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी रोहितने चाहत्यांचे आभार मानत एक मोठे आश्वासन दिले. रोहित म्हणाला, "आमची साथ दिल्याबद्दल धन्यवाद. यावेळेस आम्ही तुमच्यासाठी ट्रॉफी जिंकू. यंदा मिशन नंबर ६!" रोहितच्या या विधानाने मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ साठी विजयाचे रणशिंग फुंकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

समायराची मस्ती आणि खेळाडूंचा डान्स

केवळ क्रिकेटच नव्हे, तर खेळाडूंच्या कौटुंबिक आणि मजेशीर बाजूही या कार्यक्रमात पाहायला मिळाल्या. रोहित शर्मा आपली मुलगी समायरासोबत या कार्यक्रमात पोहोचला होता. युवा खेळाडू टिळक वर्मा समायरासोबत खेळताना दिसला, तर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी संगीताच्या तालावर जोरदार डान्स करून स्टेजवर 'गदर' माजवला. संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ देखील या आनंदाच्या क्षणात सहभागी झाले होते. खेळाडूंमधील हे मैत्रीपूर्ण नाते आगामी हंगामात मुंबईसाठी सकारात्मक ठरू शकते.

पाचवेळच्या चॅम्पियनची सहाव्या जेतेपदावर नजर

मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये अशा एकूण पाच वेळा जेतेपदावर नाव कोरले आहे. गेल्या काही हंगामांपासून विजेतेपदाने हुलकावणी दिली असली, तरी यंदा हार्दिकच्या नेतृत्वाखाली आणि रोहित-सूर्याच्या अनुभवाच्या जोरावर मुंबई सहाव्यांदा चषक उचलण्यासाठी सज्ज आहे. रोहितने स्वतः 'मिशन ६' चा उल्लेख केल्याने प्रतिस्पर्धी संघांचे धाबे आत्ताच दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT