Football  Dainik Gomantak
क्रीडा

Super Cup: मुंबई सिटी ठरले चर्चिल ब्रदर्सला भारी

इंज्युरी टाईम पेनल्टी गोलमुळे 2-1 फरकाने विजय

किशोर पेटकर

Super Cup: सामन्याच्या सुरवातीस एका गोलने पिछाडीवर पडूनही मुंबई सिटी संघ गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला भारी ठरला. आयएसएल लीग शिल्ड विजेत्या संघाने सुपर फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी 2-1 फरकाने विजय नोंदविला.

केरळमधील मांजेरी येथील पय्यनाड स्टेडियमवर सामना झाला. सामन्याच्या भरपाई वेळेस केलेल्या पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटीने विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. इंज्युरी टाईममधील दुसऱ्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सच्या खेळाडूने मुंबई सिटीच्या विक्रम प्रताप सिंग याला गोलक्षेत्रात पाडले. त्यानंतर 90+3 व्या मिनिटास लाल्लियानझुआला छांगटे याने स्पॉट किकवरून अचूक नेम साधला.

त्यापूर्वी विश्रांतीला दोन्ही संघ 1-1 असे गोलबरोबरीत होते. सामन्याच्या 27 व्या मिनिटास मुंबई सिटीने बरोबरी साधली. रॉलिन बोर्जिसच्या शानदार चालीवर मेहताब सिंग याचे हेडिंग भेदक ठरले. सामन्याच्या नवव्याच मिनिटास चर्चिल ब्रदर्सने आघाडी घेतली. अन्सुमाना क्रोमा याच्या शानदार गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला सामन्यात स्वप्नवत सुरवात करता आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT