Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022 मध्ये या 5 खेळाडूंनी ठोकले सर्वाधिक षटकार, सूर्याचाही जलवा

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजनाने भरलेला होता.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 क्रिकेट चाहत्यांसाठी मनोरंजनाने भरलेला होता. या स्पर्धेत चाहत्यांना अनेक मोठे षटकारही पाहायला मिळाले. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी यावेळी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. या यादीत टीम इंडियाचा एकच खेळाडू स्थान मिळवू शकला आहे.

दरम्यान, टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) मध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा सर्वाधिक षटकार मारण्यात आघाडीवर आहे. या स्पर्धेत त्याने एकूण 8 सामने खेळताना 11 षटकार ठोकले. इंग्लंडचा (England) सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अ‍ॅलेक्स हेल्सने 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत 6 सामने खेळताना एकूण 10 षटकार मारले, त्यापैकी उपांत्य फेरीत भारताविरुद्ध (India) त्याने 7 षटकार मारले.

तसेच, T20 विश्वचषक 2022 मध्ये श्रीलंकेचा कुसल मेंडिस हा तिसरा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. कुसल मेंडिसने 8 सामन्यात 10 षटकार ठोकले. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्कस स्टॉइनिसनेही शानदार फॉर्म होता. मार्कस स्टॉइनिसने 4 सामन्यात 9 षटकार ठोकले.

शिवाय, या यादीत समावेश झालेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवने 6 सामन्यात 9 षटकार ठोकले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही त्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

Goa Drug Network Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह बनले ड्रग्ज रॅकेटचे कंट्रोल रूम; आंतरराज्य जाळे, 43 लाखांचा ड्रग्ज साठा जप्त, 5 जण अटकेत

Mallikarjun Kharge Attacks Amit Shah: 'लाठीमारासाठी शहाच जबाबदार','जनता तुम्हाला बंद खोलीतून बाहेर खेचून काढेल!' मल्लिकार्जुन खर्गेंचा गृहमंत्री अमित शहांना राज्यसभेतून थेट इशारा

Goa Electricity Employees Suspended: वीज धक्क्यांमुळे मृत्यू प्रकरणांवर मोठी कारवाई!खात्यात निलंबनाचे झटके; 3 साहाय्यक अभियंत्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

SCROLL FOR NEXT