Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: आयपीएलमधील 'हा' मोठा रेकॉर्ड किंग कोहली करणार ध्वस्त! अलीकडील...

Virat Kohli: यंदाचा आयपीएल हंगाम लवकरच सुरु होणार आहे. 31 मार्चपासून क्रिकेटच्या या महाकुंभात जगातील सर्व दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

Manish Jadhav

Virat Kohli: यंदाचा आयपीएल हंगाम लवकरच सुरु होणार आहे. 31 मार्चपासून क्रिकेटच्या या महाकुंभात जगातील सर्व दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 2 महिन्यांहून अधिक काळ चालणारी ही क्रिकेट स्पर्धा चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीच असणार आहे.

पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने असतील. या आयपीएल हंगामात स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम करु शकतो.

कोहली होणार आयपीएलचा 'किंग'?

विराट कोहली (Virat Kohli) यावेळी पुन्हा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आला आहे. आरसीबीच्या चाहत्यांसाठी आणि संघासाठी यापेक्षा चांगली बातमी असू शकत नाही.

अशा परिस्थितीत विराट यावेळी आयपीएलचा मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो. ख्रिस गेलला मागे टाकण्याची विराटकडे चांगली संधी आहे. कोहलीने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 4 शतके झळकावली आहेत.

ख्रिस गेलच्या सर्वाधिक 6 शतकांचा विक्रम मोडण्यापासून तो फक्त 2 शतके दूर आहे. कोहली सध्या ज्याप्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता हा विक्रम मोडता येऊ शकतो.

तसेच, विराट कोहलीसाठी 2016 चा आयपीएल हंगाम खास होता. विश्वास ठेवा, शतक झळकावण्याची त्याला सवय झाली होती.

2016 च्या आयपीएलमध्ये (IPL) त्याने 4 झटपट शतके झळकावली होती. या हंगामात त्याने 973 धावा काढल्या, ज्या आयपीएलच्या एका हंगामात फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT