Hakim Ziyech Dainik Gomantak
क्रीडा

Morocco: संघ हरला, पण मोरोक्कन फुटबॉलरने जिंकली मनं! वर्ल्डकपमधील कमाई केली दान

मोरोक्कोच्या फुटबॉलपटूने वर्ल्डकपमधील कमाई दान केली आहे.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 संपून आता आठवडा उलटला आहे, असे असतानाही या वर्ल्डकपच्या चर्चा अद्याप सुरू आहेत. आता अशी माहिती समोर येत आहे की मोरोक्को आणि चेल्साचा फुटबॉलपटू हकीम झियेच याने वर्ल्डकप बोनस त्याच्या देशातील गरजू लोकांना दान केला आहे.

(Moroccan Footballer Hakim Ziyech donates 2022 World Cup earnings)

रिपोर्ट्सनुसार झियेचने त्याच्या फिफा वर्ल्डकपमधून मिळालेली कमाई त्याच्या देशातील गरिब जनतेला दान केल्याने त्याचे कौतुकही होत आहे. त्याने फिफा वर्ल्डकपमधील बोनस 277,575.90 डॉलर मोरोक्कोतील गरजूंना वाटले आहेत.

याबद्दल झियेच म्हणाला, 'हो, मी माझी वर्ल्डकपमधील कमाई गरिब लोकांना दान करणार आहे. मी पैशांसाठी मोरोक्कोकडून खेळणे निवडले नव्हते, मी मनापासून मोरोक्कोकडून खेळलो.'

मोरोक्कोची वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी

मोरोक्कोने फिफा वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यांनी साखळी फेरीत क्रोएशियाविरुद्ध बरोबरी साधली होती, तर बेल्जियम आणि कॅनडाला पराभूत केले होते. त्यामुळे त्यांनी ग्रुप एफमध्ये अव्वल क्रमांक मिळवत बाद फेरीत प्रवेश केला होता.

मोरोक्कोने उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनला पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-0 असे पराभूत केले होते. त्यानंतर त्यांनी पोर्तुगाल संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का देत स्पर्धेतून बाहेर केले होते. त्यावेळी मोरोक्को फुटबॉल वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला होता.

मात्र, उपांत्य फेरीत त्यांना फ्रान्सकडून पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकासाठी सामना खेळावा लागला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात त्यांनी क्रोएशियाविरुद्ध पराभव स्विकारला. त्यामुळे मोरोक्को फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT