Indian Team Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup साठी भारतीय संघात होऊ शकतो बदल, या खेळाडूला मिळणार एन्ट्री !

T20 World Cup Indian Team: 2022 च्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup Indian Team: 2022 च्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या दोन्ही मालिकेनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होऊ शकतात. चला जाणून घेऊया कसे?

या खेळाडूला प्रवेश मिळू शकतो!

भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याला स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र शमीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यास त्याला मुख्य संघात स्थान मिळू शकते. शमी डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करतो. कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. शमीने भारताकडून 17 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.

हा आयसीसीचा नियम

आयसीसीच्या नियमांनुसार, स्पर्धा सुरु होण्याच्या एक आठवडा आधीपर्यंत सर्व संघ त्यांच्या मुख्य संघात राखीव खेळाडूंचा समावेश करु शकतात. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका मोहम्मद शमीच्या कारकिर्दीसाठी टर्निंग पॉंईट ठरु शकते.

या गोलंदाजांना T20 विश्वचषकात स्थान मिळाले

निवड समितीने टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) केवळ चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. त्यात जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांना संधी देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाचव्या वेगवान गोलंदाजासाठी अष्टपैलू हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) वापर करु शकतो. आशिया कपमध्ये मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमुळे निवडकर्त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT