Mohammad Shami BCCI
क्रीडा

World Cup 2023: शानदार शमी! सेमी-फायनलमध्ये 7 विकेटस घेत 'या' 7 रेकॉर्ड्सलाही घातली गवसणी

Mohammad Shami: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट्स घेत मोठ्या विश्वविक्रमांनाही गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final, Mohammad Shami 7 Wickets Records:

बुधवारी भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली. भारतीय क्रिकेट संघाने 12 वर्षांनी वनडे वर्ल्डकप अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताच्या या यशात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने महत्त्वाचे योगदान दिले, ज्यामुळे त्याने सामनावीर पुरस्कारही जिंकला.

शमीच्या 7 विकेट्स

शमीने या सामन्यात 9.5 षटकात 57 धावा देत 7 विकेटस घेतल्या. त्यामुळे तो भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात 7 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर आता भारताकडून वनडेत सर्वोत्तम वैयक्तिक गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. याआधी हा विक्रम स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर होता. त्याने 2014 साली बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडेत 4 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

इतकेच नाही, तर शमी वनडे वर्ल्डकपच्या बाद फेरीत (नॉकआऊट) 7 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला. यापूर्वी वर्ल्डकपच्या बाद फेरीत सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमोर यांच्या नावावर होता. त्यांनी 1975 वर्ल्डकपच्या बाद फेरीत इंग्लंडविरुद्ध 14 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

चौथ्यांदा 5 विकेट्स हॉल

शमीने वनडे वर्ल्डकपमध्ये चौथ्यांदा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी नोंदवली आहे. त्यामुळे त्याने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा एका सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याने मिचेल स्टार्कला मागे टाकले आहे. स्टार्कने असा कारनामा 3 वेळा केला आहे.

त्याचबरोबर शमीने वर्ल्डकप 2023 स्पर्धेतच तीनवेळा एका सामन्यात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने यापूर्वी 2019 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे हा एकाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तीन वेळा 5 विकेट्स घेणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम कोणालाही करता आला नव्हता.

शमीने झहीर खानला टाकले मागे

मोहम्मद शमीने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 6 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम झहीर खानच्या नावावर होता. झहीरने 2011 वर्ल्डकपमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या.

वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्स

मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना वनडे वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्सही पूर्ण केल्या. तो वनडे वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये शमी पाठोपाठ  जवागल श्रीनाथ आणि झहीर खान आहे. या दोघांनीही प्रत्येकी 44 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर शमीने या 50 विकेट्स अवघ्या 17 सामन्यातच घेतल्या आहेत. त्यामुळे तो वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी डावात आणि सर्वात कमी चेंडूत 50 विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला आहे. त्याने याबाबत मिचेल स्टार्कला मागे टाकले आहे.

शमीने वनडे वर्ल्डकपमध्ये 17 डावात आणि 795 चेंडूत 50 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला मागे टाकले आहे. स्टार्कने वनडे वर्ल्डकपमध्ये 19 डावात आणि 941 चेंडूत 50 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT