हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद पुन्हा एकदा मोहम्मद अझरुद्दीन यांना बहाल करण्यात आले आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

मोहम्मद अझरुद्दीन यांना पुन्हा हैदराबाद क्रिकेट आसोसिऐशनचे अध्यक्षपद बहाल

अपेक्स काउन्सिला असा निर्णय घेता येत नाही. निवडलेल्या अध्यक्षांना निलंबित करण्याचा ठराव देखील मी रद्द करत आहे. असे न्यायमूर्ती वर्मा यांनी नमूद केले.

दैनिक गोमन्तक

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (Hyderabad Cricket Association) अध्यक्षपद पुन्हा एकदा मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांना बहाल करण्यात आले आहे. लोकपाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) दीपक वर्मा (Deepak Verma) यांनी अझरुद्दीला निलंबित करणाऱ्या अपेक्स कांउसिलच्या सदस्यांवर कारवाई करत त्यांना अयोग्य ठरविले आहे.

अंतरिम आदेशानुसार न्यायमूर्ती वर्मा यांनी एचसीएचे सदस्य के जॉन मनोज, उपाध्यक्ष आर विजयनंद, नरेश शर्मा, सुरेंद्र आणि अनुराधा यांना तात्परते अपात्र ठरविले आहे. त्यांनी अजहरुद्दीन यांचे घटनेच्या उल्लंघनाखाली निलंबन केले होते. न्यायमूर्ती वर्मा यांनी दिलेल्या आदेशात म्हणले, अझरुद्दीन विरोधातील तक्रार यांच्याकडे पाठविण्यात आली नव्हती. त्यामुळे अझरुद्दीन यांच्या निलंबनाचा निर्णय अधिकृत नाही.

याबाबत बोलताना न्यायमूर्ती वर्मा म्हणाले, अपेक्स काउन्सिला असा निर्णय घेता येत नाही. निवडलेल्या अध्यक्षांना निलंबित करण्याचा ठराव देखील मी रद्द करत आहे. याबरोबर त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांच्याविरोधात कारवाई करण्यात येऊ नये. त्यामुळे ते हैदराबाद क्रिकेटच्या अध्यक्षपदी कायम असतील. पदाधिकाऱ्याविरोधात फक्त लोकपालच निर्णय घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT