हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे मोहम्मद अझरुद्दीन Dainik Gomantak
क्रीडा

मोहम्मद अझरुद्दीनने केला मदतीचा हात पुढे...

मोहम्मद अझरुद्दीनने माजी भारतीय क्रिकेटपटू नोएल डेव्हिडची घेतली भेट

दैनिक गोमन्तक

हैदराबाद: क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांनी सोमवारी माजी भारतीय क्रिकेटपटू नोएल डेव्हिडची भेट घेतली आणि त्यांना आश्वासन दिले की मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेच्या खर्चासह त्याच्या उपचार खर्चाची काळजी घेईल. भारतासाठी एकदिवसीय चार सामने खेळलेला 51 वर्षीय डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराशी झुंज देत असून बुधवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

(Mohammad Azharuddin of Hyderabad Cricket Association extended a helping hand)

HCA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आज हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन (Mohmmad Azharuddin) यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये नोएल डेव्हिडची भेट घेतली. या महिन्यात ज्युबली हिल्स येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये (Hospital) किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेतून नोएल बरा होत आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांनीही डॉ. सुब्रमण्यन यांची भेट घेऊन शस्त्रक्रिया आणि त्यानंतर घ्यायची खबरदारी जाणून घेतली.

नोएलच्या शस्त्रक्रियेचा खर्च एचसीए उचलणार असल्याचा पुनरुच्चार अझरने केला. "अपोलो जुबली हिल्सचे सीओओ तेजस्वी राव यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, अझरुद्दीनने सांगीतले की नोएलच्या शस्त्रक्रियेचा खर्च एचसीए उचलेल आणि नोएलच्या दैनंदिन वैयक्तिक खर्चालाही मदत केली जाईल," असे आश्वासन दिले. उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफस्पिनर गोलंदाज असलेल्या डेव्हिडने 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT