Mitchell Starc | Kushal Perera ICC
क्रीडा

AUS vs SL: स्टार्कने मनं तर जिंकली, पण ऑस्ट्रेलियाला महागात पडलं जीवदान

Mitchell Starc: श्रीलंकेच्या सलामीवीराला स्टार्कने दिलेले जीवदान ऑस्ट्रेलियासाठी मात्र महागात पडले आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Sri Lanka vs Australia, Mitchell Starc:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सोमवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात लखनऊमध्ये सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर श्रीलंकने 210 धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, या सामन्यात मिचेल स्टार्कच्या एका कृतीची मोठ्याप्रमाणात चर्चा होत आहे. झाले असे की या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि कुशल परेरा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, पहिल्याच षटकात परेरा नॉन-स्ट्रायकरला असताना त्याला धावबाद करण्याची संधी होती. कारण स्टार्कने चेंडू टाकण्यापूर्वीच परेराने क्रिज सोडल्याचे त्याने पाहिले.

मात्र, स्टार्कने त्यावेळी त्याला वॉर्निंग दिली. त्यानंतर अशीच गोष्ट पाचव्या षटकातही घडली. त्यावेळीही स्टार्कच गोलंदाजी करत होता आणि परेरा चेंडू पडण्यापूर्वीच क्रिज सोडत होता. त्यावेळीही स्टार्कने त्याला बजावले होते.

दरम्यान, स्टार्कने परेराला दोनदा दिलेल्या जीवदानाबद्दल अनेक क्रिकेट चाहत्यांनी कौतुक केले आहे. पण, स्टार्कने दिलेले हे जीवदान ऑस्ट्रेलियासाठी मात्र महागात पडले. कारण परेराने नंतर 82 चेंडूत 78 धावांची खेळी केली. तसेच पाथम निसंकाने 67 चेंडूत 61 धावांची खेळी केली.

परेरा आणि निसंका यांनी सलामीला 125 धावांची भागीदारी केली. पण त्यांची जोडी अखेर निसंकाला 22 व्या षटकात पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर परेरालाही कमिन्सने 27 व्या षटकात बाद केले.

यानंतर मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व राखले. कारण सलामीवीर बाद झाल्यानंतर श्रीलंकेकडून केवळ चरिथ असलंकाने (25) दोन आकडी धावसंख्या गाठली. त्यामुळे श्रीलंका संघ 43.4 षटकात 209 धावांवर सर्वबाद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने 4 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर ग्लेन मॅक्सवेलने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT