Mayanti Langer Twitter
क्रीडा

IPL मध्ये मयंतीसह शास्त्रींचे कमबॅक, नेटकरी म्हणाले गोव्याला चालले काय?

मयंती लँगरने माजी भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीसोबत लग्न केले आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 सुरू झाल्यामुळे अँकर मयंती लँगरही परतली आहे. शनिवारी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यातील पहिल्या सामन्याच्या प्री-शोमध्ये मयंती लँगर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत जहाजावर दिसली. रवी शास्त्रीही पाच वर्षांनंतर आयपीएल कॉमेंट्रीमध्ये परत आले आहे.

मयंती लँगर आपल्या मुलाच्या जन्मामुळे मागील दोन आयपीएल (IPL 2022) हंगामांना मुकली होती. मयंती लँगरने माजी भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीसोबत लग्न केले आहे. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बिन्नी आणि मयंती यांनी 2012 मध्ये लग्न केले.

विशेष म्हणजे मयंतीने बिन्नीची पहिली मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत मयंतीने बिन्नीला त्यांच्या नात्याच्या बातम्यांबद्दलही विचारले होते. नंतर दोघांनीही एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. मयंती व्यतिरिक्त, संजना गणेशनसह इतर काही अँकर देखील IPL 2022 मध्ये दिसणार आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया-

संजना गणेशन: संजना गणेशन ही सर्वात लोकप्रिय अँकर आहे. महिला विश्वचषक कव्हर करण्यासाठी संजना सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. महिला विश्वचषक संपल्यानंतर, संजना आयपीएलच्या प्री आणि पोस्ट शोचे अँकरिंग करण्यासाठी स्टार स्पोर्ट्समध्ये सामील होणार. संजनाने गेल्या वर्षी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहशी लग्न केले.

तान्या पुरोहित: मूळची उत्तराखंडची असलेल्या तान्याने गढवाल विद्यापीठातून मास कम्युनिकेशन केले आहे. तान्या अनुष्का शर्मा स्टारर NH-10 मध्ये देखील दिसली होती. तेव्हापासून तान्याला बॉलीवूड तसेच क्रिकेट शोच्या अनेक ऑफर्स येत आहेत. तान्याने न्यूज अँकर दीपक डोवालसोबत लग्न केले आहे.

नेरोली मेडोज: आयपीएल 2022 दरम्यान, ऑस्ट्रेलियन अँकर नेरोली मेडोज देखील यंदाच्या IPLमध्ये दिसणार आहे. मीडोज अनेक क्रिकेट शो होस्ट करताना दिसली आहे. तिला फुटबॉल आणि बास्केटबॉल शोचे अँकरिंग करण्याचाही अनुभव आहे. तिने आयपीएल 2020 आणि 2021 मध्ये अँकरिंग देखील केले.https://www.youtube.com/watch?v=Gx0SC58mQHA

नशप्रीत कौर: नशप्रीत कौरचा जन्म फिजीमध्ये झाला आणि तिचे पालनपोषण मेलबर्नमध्ये झाले. इंग्रजी आणि पंजाबीशिवाय नशप्रीत अस्खलित हिंदीही बोलते. तिला अनेक क्रिकेट शो करण्याचा अनुभव आहे. UAE मध्ये झालेल्या IPL 2020 मध्ये नशप्रीतच्या अँकरिंगचे खूप कौतुक झाले.

दरम्यान आयपीएलच्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर त्यात केकेआरने बाजी मारली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने नऊ चेंडू राखून सीएसकेचा सहा गडी राखून पराभव केला. उमेश यादवला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Shirgaon Stampede: 'शिरगाव' दोषींवर कारवाई होणार? गृह खात्याकडून फाईल सरकारकडे, काय आहे चौकशी समितीचे म्हणणे?

Horoscope: भाग्याची साथ! मेष-मिथुन राशींसह 'या' 5 राशींचा दिवस मंगलकारी; करिअर, नोकरी व व्यवसायात मिळेल सकारात्मक फळ

Goa Government Scheme: 'स्‍वस्‍थ नारी, सशक्‍त परिवार' योजने अंतर्गत तपासणी करून घ्‍या, CM सावंतांचे महिलांना आवाहन

India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने, सुपर-4 मधील 'हाय होल्टेज' सामना 'या' दिवशी रंगणार; जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT