Mayank Agarwal Twitter/ @mufaddal_vohra
क्रीडा

Mayank Agarwal: महाराजा ट्रॉफीमध्ये मयंक अग्रवालचा जलवा, तूफानी शतक ठोकत....

Kalyani Bengaluru Blasters: भारताचा स्टार खेळाडू मयंक अग्रवालने शानदार शतक झळकावले आहे.

Manish Jadhav

Kalyani Bengaluru Blasters: भारताचा स्टार खेळाडू मयंक अग्रवालने शानदार शतक झळकावले आहे. वास्तविक, मयंकने महाराजा ट्रॉफीमध्ये कल्याणी बंगलोर ब्लास्टर्ससाठी अफलातून फलंदाजी केली.

मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) 57 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकार मारले. म्हैसूर वॉरियर्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सने 20 षटकांत 4 बाद 212 धावा केल्या होत्या. कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सकडून मयंक अग्रवाल व्यतिरिक्त डेगा निश्चलने 25 चेंडूत 29 धावा केल्या.

कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सने म्हैसूर वॉरियर्ससमोर मोठे लक्ष्य ठेवले होते

दरम्यान, सूरज आहुजाने 10 चेंडूत 35 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले.

त्याचवेळी, शुभांग हेगडेने 17 चेंडूत 24 धावा केल्या. अशाप्रकारे कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सच्या संघाला 20 षटकांत 2 बाद 212 धावांपर्यंत मजल मारता आली. म्हैसूर वॉरियर्सकडून जगदीश सुचितने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर मनीष रेड्डी आणि गौतम मिश्राला अनुक्रमे 1-1 विकेटस मिळाली.

त्याचवेळी, कल्याणी बंगलोर ब्लास्टर्सच्या 212 धावांच्या प्रत्युत्तरात म्हैसूर वॉरियर्सच्या संघाने 10.1 षटकात 1 बाद 117 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, म्हैसूर वॉरियर्सला विजयासाठी शेवटच्या 10 षटकांत 96 धावा कराव्या लागतील, तर 9 विकेट शिल्लक आहेत.

यावेळी करुण नायर आणि एसयू कार्तिक फलंदाजी करत आहेत. करुण नायर 22 चेंडूत 20 धावा करुन खेळत आहे. तर एसयू कार्तिक 27 चेंडूत 64 धावा करुन क्रीजवर आहे. करुण नायर आणि एसयू कार्तिक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 36 चेंडूत 63 धावांची भागीदारी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT