Mayank Agarwal Dainik Gomantak
क्रीडा

मयंक अग्रवालने तब्बल 34 वर्षांचा मोडला विक्रम, बनला भारताचा नंबर वन फलंदाज

भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावले.

दैनिक गोमन्तक

भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मयंक अग्रवाल 120 धावा करून नाबाद होता. त्याने खेळाच्या पहिल्या दिवशी 246 चेंडूंचा सामना करत 3 षटकारासह 14 चौकारांच्या मदतीने ही खेळी उभारली. मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी आपल्या नाबाद 120 धावांच्या जोरावर मयंक अग्रवालने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. आता तो वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी सर्वात मोठी व्यक्तिगत खेळी खेळणारा फलंदाज ठरला. ज्या परिस्थितीत मयंकने ही खेळी खेळली ते कौतुकास पात्र आहे.

मयंकने 34 वर्षांचा सुनील गावस्करचा विक्रम मोडला

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मयंक अग्रवालच्या आधी भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 1976 साली पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात गावस्करने 20 चौकारांच्या मदतीने 119 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 162 धावांनी विजय मिळवला. यानंतर हा विक्रम आतापर्यंत कायम होता, मात्र आता 34 वर्षांनंतर भारतीय सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवालने न्यूझीलंडविरुद्ध 120 धावा करत गावस्करचा विक्रम मोडला.

भारताला 80 धावांवर तीन धक्के बसले

मुंबई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर, शुभमन गिलसह मयंकने पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी करुन संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यानंतर गिल 44 धावांची खेळी खेळून बाद झाला. त्यानंतर 80 धावांच्या स्कोअरवर टीम इंडियाची दुसरी विकेट शून्यावर बाद झालेल्या पुजाराच्या रूपात पडली, तर 80 धावांवर भारताने पुन्हा कर्णधार कोहलीच्या रुपाने तिसरी विकेट गमावली. या सामन्यात कोहलीला खातेही उघडता आले नाही. यानंतर मयंकने श्रेयस अय्यरसोबत चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली, मात्र पुन्हा एकदा 160 धावांवर 18 धावा करुन श्रेयस बाद झाला. यानंतर मयंकने साहासोबत पाचव्या विकेटसाठी चांगली भागीदारी करत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाला 221 धावांपर्यंत नेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

SCROLL FOR NEXT