Matthew Hayden Dainik Gomantak
क्रीडा

Matthew Hayden पुन्हा पाक संघात, T20 World Cup साठी मिळाली 'ही' जबाबदारी

ICC T20 World Cup: आयसीसी टी-20 विश्वचषक यंदा ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

ICC T20 World Cup: आयसीसी टी-20 विश्वचषक यंदा ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. यासाठी पाकिस्तान संघ आत्तापासूनच तयारीला लागला आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनकडे संघाच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफमध्ये आधीच ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट आहेत, ज्यांच्या देखरेखीखाली पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे. T20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंचा संघात समावेश होणे, हे पाकिस्तानसाठी चांगले संकेत आहेत.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शुक्रवारी याची घोषणा केली. 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत जेव्हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला तेव्हा मॅथ्यू हेडन पाकिस्तानी कोचिंग स्टाफचा एक भाग होता. 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने (Pakistan) साखळी फेरीत भारत (India), न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला होता.

तसेच, हेडन 15 ऑक्टोबर रोजी ब्रिस्बेनमध्ये संघात सामील होईल, जेव्हा संघ क्राइस्टचर्चहून तिथे पोहोचेल. पाकिस्तान संघ तिथे न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत टी-20 मालिका खेळणार आहे. पीसीबी प्रमुख रमीझ राजा (Ramiz Raja) म्हणाले की, 'मी मॅथ्यू हेडनचे पाकिस्तानच्या जर्सीत पुन्हा स्वागत करतो. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी तो पाकिस्तानी संघासाठी खूप उपयुक्त ठरेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT