Copy of Gomantak Banner  (47).jpg
Copy of Gomantak Banner (47).jpg 
क्रीडा

आयएसएल : जमशेदपूरची हैदराबादशी गोलशून्य बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : गमावलेल्या संधी आणि कमजोर नेमबाजी यामुळे जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसी यांच्यातील सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. सामना रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला.

सलग तीन पराभवानंतर किमान बरोबरीचा एक गुण मिळाल्याचे समाधान ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरला लाभले. त्यांची ही 13 लढतीतील पाचवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 14 गुण झाले असून ते सातव्या क्रमांकावर आले आहेत. हैदराबादची ही सलग तिसरी बरोबरी ठरली. पाच सामने अपराजित असलेल्या मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची एकंदरीत 13 लढतीतील सहावी बरोबरी ठरली. 18 गुणांसह त्यांचा चौथा क्रमांक कायम राहिला.

पूर्वार्धात दोन्ही संघांना संधी होत्या, परंतु नेमबाजी अचूक ठरू शकली नाही, त्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. विश्रांतीस तीन मिनिटे बाकी असताना हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने जागा सोडलेली असताना ऐतॉर मॉनरॉयच्या कॉर्नर किकवर स्टीफन एझे याने साधलेला हेडर गोलपट्टीस आपटल्यानंतर आशिष राय याने चेंडू दिशाहीन केला. त्यापूर्वी जमशेदपूरच्या फारुख चौधरी याचा फटकाही सदोष ठरला होता.

एकविसाव्या मिनिटास हैदराबादच्या हालिचरण नरझारी याला गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश दक्ष ठरला. त्याच्या हाताला लागून चेंडू नंतर गोलपोस्टला आपटल्यामुळे दिशाहीन ठरला. सामन्याच्या नवव्या मिनिटास जमशेदपूरने चांगली मुसंडी मारली होती. यावेळसही ऑस्ट्रेलियन जोएल चियानेज याला रेहेनेश याने यशस्वी होऊ दिले नाही.

सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी पुढे आलेला असताना फारुख चौधरीने मारलेला फटका लक्ष्य साधू शकला नाही, त्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

दृष्टिक्षेपात...

- यंदा स्पर्धेत जमशेदपूरच्या 5, तर हैदराबादच्या 4 क्लीन शीट्स

- पहिल्या टप्प्यातही उभय संघांत 1-1 गोलबरोबरी

- हैदराबाद 5 लढतीत अपराजित, 2 विजय व 3 बरोबरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Vasco News : रापणकारांना सरकार करणार मदत : मुख्यमंत्री सावंत

America Crime: 17 रुग्णांना इन्सुलिनने मारणाऱ्या नर्सला जन्मठेपेची शिक्षा; 19 प्रकरणांमध्ये ठरवलं दोषी

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT