Manpreet Singh Gony joins AAP Dainik Gomantak
क्रीडा

Cricket to Politics: IPLमध्ये चेन्नई, डेक्कन, गुजरात अन् पंजाबकडून खेळला; आता हातात घेतला 'झाडू', धोनीसोबत खेळलेल्या क्रिकेटपटूची राजकारणात एन्ट्री!

Manpreet Singh Gony joins AAP: भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीसोबत खेळलेला माजी क्रिकेटपटू मनप्रीत सिंग गोनी आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीसोबत खेळलेला माजी क्रिकेटपटू मनप्रीत सिंग गोनी आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या मैदानानंतर त्याने राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवले आहे. 19 ऑगस्ट रोजी गोनीने आम आदमी पार्टीमध्ये (AAP) प्रवेश केला. पंजाब विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

गोनीसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावलेल्या खेळाडू कुमार यांनीही आम आदमी पक्षात प्रवेश केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दोन्ही खेळाडूंचे पक्षात स्वागत केले. यावेळी कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंग खुडियान हेही उपस्थित होते.

दोन्ही खेळाडूंच्या पक्षप्रवेशानंतर आम आदमी पक्षाने पंजाबमधील युवा आणि क्रीडा क्षेत्राशी असलेले संबंध आणखी मजबूत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी पक्षाकडून संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू झाली आहे.

पक्षात प्रवेश केल्यानंतर मनप्रीत गोनी आणि कुमार यांनी भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे गोनीच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सत्ताधारी पक्षासोबत झाली आहे.

मनप्रीत सिंग गोनीने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये केले. 2008 च्या आशिया कपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. हाँगकाँगविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धही त्याला खेळण्याची संधी मिळाली.

भारतासाठी गोनीने दोन वनडे सामने खेळले असून त्याच्या नावावर दोन विकेट आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची कारकीर्द मोठी नसली तरी देशांतर्गत आणि आयपीएल क्रिकेटमध्ये त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

IPLमध्ये दमदार सुरुवात

आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 मध्ये गोनीने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली. पहिल्याच हंगामात त्याने 17 विकेट घेत आपल्या गोलंदाजीची छाप पाडली. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने चेन्नईच्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली.

यानंतर त्याने डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या फ्रँचायझींचेही प्रतिनिधित्व केले. एकूण 44 आयपीएल सामन्यांत त्याने 37 विकेट घेतल्या.

2019 मध्ये घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

पंजाबकडून दीर्घकाळ देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर मनप्रीत गोनीने जून 2019 मध्ये व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेल्यानंतर आता त्याने राजकारणात प्रवेश करून आपल्या कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू केला आहे.

गोनीचा क्रिकेटमधील अनुभव, पंजाबमधील क्रीडा क्षेत्राशी असलेले संबंध आणि खेळाडू म्हणून असलेली ओळख याचा राजकीय प्रवासात त्याला किती फायदा होतो, हे आगामी काळात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राजकीय मैदानात एंट्री

महेंद्रसिंह धोनीसोबत आयपीएलमध्ये खेळलेल्या गोनीने आता क्रिकेटच्या मैदानाऐवजी राजकीय मैदान निवडले आहे. पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्याचा AAP प्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे. आता पक्ष त्याला कोणती जबाबदारी देतो आणि निवडणुकीच्या मैदानात त्याची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak Old Newspaper: 'जुने ते सोने'! 63 वर्षे उलटली, पण आठवणी ताज्याच! पांडुरंग फडते यांनी जपला 'गोमन्तक'चा ऐतिहासिक अंक

Sachin vs Virat: "सचिनपेक्षा विराटच श्रेष्ठ!" दिग्गज क्रिकेटपटूच्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ

Goa Cricket: गोव्याचा यष्टिरक्षकाचा प्रश्न सुटणार? शिवेंद्र भुजबळच्या फलंदाजीने दिला मोठा दिलासा

Hit And Run Case: मयडेतील हिट-ॲण्‍ड-रनचा छडा; पादचाऱ्याला चिरडून पसार झालेल्‍या वाहनचालकाला अटक

Lucky Zodiac Signs 2026: आर्थिक संकट अन् करिअरवर टांगती तलवार! 'या' राशीसाठी धोक्याची घंटा; शुक्राची उलटी चाल ठरणार कठीण काळाची नांदी

SCROLL FOR NEXT