Manipur CM announces Rs 1 crore reward on Mirabai Chanu  Dainik Gomantak
क्रीडा

Mirabai Chanuला मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांकडून '1 कोटींचे' बक्षीस जाहीर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo olympic) महिला 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने (Mirabai Chanu) भारताला रौप्य पदक मिळवुन दिले.

दैनिक गोमन्तक

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग (N.biren singh) यांनी जाहीर केले की, शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राज्य सरकार एक कोटी रुपयांचा रोख पुरस्कार देणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला 49 किलो वजनी गटात मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने शनिवारी भारताला रौप्य पदक मिळवुन दिले. (Manipur CM announces Rs 1 crore reward on Mirabai Chanu)

टोकियो ऑलिम्पिकच्या(Tokyo Olympics) पहिल्याच दिवशी भारताने(India) पदकांच्या यादीमध्ये आपले खाते उघडले आहे. मीराबाई चानूने(Mirabai Chanu) वेटलिफ्टिंगमध्ये (Weightlifting) महिलांच्या 49 kg किलो गटात रौप्य पदक(silver medal) जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पाचवे रौप्यपदक आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी मीराबाई चानू ही दुसरी महिला वेटलिफ्टर आहे, तर चीनच्या जिजीहूने टोकियो ऑलिम्पिकमधील 49 किलो वजनी उचल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

2008 नंतर पहिल्याच दिवशीऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदाच एखादे पदक मिळाले आहे. 2008 मध्ये पहिल्याच दिवशी अभिनव बिंद्रा यांनी शूटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवलं होत.

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीरबाई ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. स्नॅचनंतर मीराबाई चानू दुसर्‍या क्रमांकावर होत्या. यानंतर मीराबाई चानूने पहिल्या प्रयत्नात 110 किलो वजन उचलले. दुसर्‍या प्रयत्नात मीराबाई चानू 115 किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरल्या. तथापि, तिसऱ्या प्रयत्नात त्या अपयशी ठरल्या आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मीराबाई चानूने पदक जिंकताच संपूर्ण देशात आनंद साजरा केला जात आहे. तिच्या या यशाने संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. मीराबाई चानू यांच्या कर्तृत्वाबद्दल आनंद व्यक्त करीत अध्यक्ष रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT