Lord Hanuman Dainik Gomantak
क्रीडा

Asian Athletics Championships मध्ये होणार बजरंगबलीचा गाजावाजा, जाणून घ्या कारण

Asian Athletics Championships: आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप टूर्नामेंट 2023 12 जुलै म्हणजेच बुधवारी थायलंडची राजधानी बँकॉक येथे सुरु होत आहे.

Manish Jadhav

Asian Athletics Championships: आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप टूर्नामेंट 2023 12 जुलै म्हणजेच बुधवारी थायलंडची राजधानी बँकॉक येथे सुरु होत आहे. नियामक मंडळाच्या स्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राम भक्त बजरंगबलीला ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे अधिकृत शुभंकर बनवण्यात आले आहे.

दरम्यान, आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, 'प्रभु रामाचे निस्सीम भक्त हुनमान यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य, धैर्य आणि बुद्धिमत्ता आहे. हनुमानाची अविश्वसनीय निष्ठा आणि भक्ती ही त्यांची सर्वात मोठी क्षमता आहे. याच कारणामुळे बजरंगबलीला शुभंकर बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

25 व्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या लोगोमध्ये गेममध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचे कौशल्य, टीम वर्क, ऍथलेटिसीझम, समर्पण आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

तजिंदरपाल सिंग आणि मुरली यांच्याकडून पदकाची आशा

शॉट पुटर तजिंदरपाल सिंग तूर आणि मुरली श्रीशंकर यांच्या नेतृत्वाखाली, भारताला (India) चॅम्पियनशिपमध्ये प्रभावी प्रदर्शनाची आशा असेल. भारतीय संघ शनिवारी रात्री दिल्ली आणि बंगळुरु येथून पाच दिवसीय आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी रवाना झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT