Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

Argentina vs Mexico: मेक्सिको विरुद्धच्या विजयाने अर्जेंटिनाचे आव्हान कायम, मेस्सीचाही विक्रमी गोल

FIFA World Cup 2022 मधील सामन्यात अर्जेंटिनाने मेक्सिकोविरुद्ध 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Argentina vs Mexico: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत शनिवारी रात्री अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको यांच्यात ग्रुप सी मधील सामना पार पडला. लुसेल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. याबरोबरच अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने एक गोल करत मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.

अर्जेंटिनाकडून मेस्सी आणि एन्झो फर्नांडिस यांनी गोल करत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाला सौदी अरेबियाकडून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, आता मेक्सिको विरुद्ध सामना जिंकत अर्जेंटिना पुन्हा विजयी मार्गावर परतले.

या सामन्यात अर्जेंटिना संघाने ऑफसाईड्सवर काम केल्याचे दिसले. कारण, सौदीविरुद्ध त्यांना ऑफसाईड्स महागात पडले होते. तसेच मेक्सिकोविरुद्ध अर्जेंटिनाचा 59 टक्के चेंडूवर ताबा होता. तर 84 टक्के पासेसची अचूकता होती. मेक्सिकोच्या पासेसमधील अचूकताही 76 टक्के होती.

दरम्यान, या सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. पण दुसऱ्या हाफमध्ये मात्र अर्जेंटिनाने (Argentina) वर्चस्व राखण्यास सुरुवात केली आणि अखेर मेस्सीने (Lionel Messi) अर्जेंटिनासाठी सामन्यात पहिला गोल केला. त्याने 64 व्या मिनिटाला अँजल डी मारियाने दिलेल्या पासवर मेक्सिकोचा गोलरक्षक गिलेर्मो ओचोआच्या डाव्या बाजूला चेंडू मारत गोल नोंदवला.

त्यानंतर सामन्यातील निर्धारित वेळ संपायला 3 मिनिट्स बाकी असताना फर्नांडिसने अर्जेंटिनासाठी दुसरा गोल करत आघाडी वाढवली. त्याने मेस्सीने दिलेल्या पासवर हा गोल केला. हा फर्नांडिसचा अर्जेंटिनासाठीचा वैयक्तिक पहिला गोल ठरला.

मेक्सिकोला नंतर एकही गोल करण्यात यश आले नाही, त्यामुळे अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

मेस्सीचा विक्रम

मेस्सीने मेक्सिकोविरुद्ध केलेला गोल हा त्याच्या फिफा वर्ल्डकपमधील (FIFA World Cup 2022) आठवा गोल ठरला. याबरोबरच त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि डिओगो मॅराडोना यांची बरोबरी केली. रोनाल्डो आणि मॅराडोना यांनीही वर्ल्डकपमध्ये 8 गोल केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

SCROLL FOR NEXT