Kumar Kartikeya Dainik Gomantak
क्रीडा

...म्हणून 9 वर्षांपासून 'हा' रणजी सुपरस्टार आई-वडिलांना भेटला नाही

मध्य प्रदेशचा क्रिकेटर कुमार कार्तिकेय 9 वर्षांपासून त्याच्या आई-वडिलांना भेटलेला नाहीये.

दैनिक गोमन्तक

9 वर्षे... 2 महिने.. आणि 3 दिवस... कसं कोण आपल्या आई वडिलांपासून लांब राहू शकतं. आणि तेही तुम्ही 25 वर्षांचे नसताना. विचित्र वाटेल पण हे खरे आहे. मध्य प्रदेशचा क्रिकेटर कुमार कार्तिकेय (Kumar Kartikeya) इतके दिवस त्याच्या आई-वडिलांना भेटलेला नाहीये. (Kumar Kartikeya Ranji superstar has not met his parents for 9 years)

त्याच्या एका मुलाखतीत ही बाब समोर आली. इतके दिवस त्याने घरी न जाण्याचे कारण म्हणजे त्याची क्रिकेटप्रती असलेली बांधिलकी हेही या मुलाखतीत उघड झाली आहे. खरे तर क्रिकेटमध्ये नाव कमावल्यावरच परत येण्याचे आश्वासन देऊन त्याने घर सोडले होते.

मुलाखतीत कार्तिकेयने सांगितले की, 'माझ्या आई-वडिलांना भेटून 9 वर्षे, 2 महिने आणि 3 दिवस झाले आहेत. कार्तिकेय म्हणतो, 'मी थोडा हट्टी असल्यामुळे मी घर सोडले होते. जेव्हा मी क्रिकेटमध्ये नाव कमावेण तेव्हाच मी घरी परतेन, असे मी माझ्या पालकांना सांगितले होते.

कार्तिकेयने या वेळी सांगितले की, तो दिल्लीत असताना रात्रपाळीही करत असे आणि 10 रुपये वाचवण्यासाठी तो बसऐवजी मैल पायी प्रवास करत होता. कार्तिकेय म्हणतो की, 'मी दिल्लीत असताना माझ्या उदरनिर्वाहासाठी टायरच्या कारखान्यात काम केले आहे. ते खूप कठीण दिवस होते, पण मला त्या सगळ्याबद्दल आता खेद वाटत नाही.'

मध्य प्रदेशला प्रथमच रणजी करंडक (Ranji Trophy) जिंकून देण्यात कुमार कार्तिकेयचा मोलाचा वाटा राहिला आहे. रणजीच्या या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा तो दुसऱ्या क्रमांकावरी खेळाडू होता. त्याने 6 सामन्यात 21 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 32 बळी घेतले. या रणजी सीजनच्या वेळी, त्याला मुंबई इंडियन्सकडून 4 सामने खेळण्याची संधी मिळाली, जिथे या डावखुऱ्या फिरकीपटूने 5 विकेट घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT