Krunal Pandya and Pollard  Dainik Gomantak
क्रीडा

...आणि कृणालने पोलार्डच्या डोक्याचे चुंबन घेतले

अखेरच्या षटकात फिरकीपटू कृणाल पांड्याने मुंबईचा धडाकेबाज फलंदाज पोलार्डला बाद केले.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये रविवारी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात एक रोमांचक सामना झाला. या सामन्यात लखनऊ संघाने बाजी मारली. सामन्यादरम्यान, एक मजेशीर किस्सा झाला. अखेरच्या षटकात फिरकीपटू कृणाल पांड्याने मुंबईचा धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्डला बाद केले. यानंतर कृणालने पोलार्डच्या डोक्याचे चुंबन घेतले. (Krunal kissed Pollard's fore head during IPL match)

मुंबई (Mumbai) संघाला शेवटच्या षटकात 38 धावांची गरज होती. हे षटक कृणाल पांड्याने टाकले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर किरॉन पोलार्डने लांबलचक षटकार मारण्याचा प्रयत्न केला, पण बाऊंड्रीवर दीपक हुडाने झेल घेतला. यानंतर सेलिब्रेशन करत असताना क्रुणालने पोलार्डच्या मागच्या बाजूने उडी मारली आणि त्याच्या डोक्याचे चुंबन घेतले.

यानंतर पोलार्ड थेट पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच षटकात पोलार्डनंतर कृणाल पांड्याने आणखी दोन बळी घेतले. त्याने जयदेव उनाडकट धावबाद केले, तर डॅनियल सॅम्सला रवी बिश्नोईने झेलबाद केले. या सामन्यात कृणाल पांड्याने 4 षटके टाकली आणि 19 धावांत 3 बळीही घेतले. सामना संपल्यानंतर क्रुणाल म्हणाला, पोलार्डला बाद केल्याने मला खूप आनंद झाला.

लखनऊने मुंबईचा 36 धावांनी पराभव केला
या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने 168 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने 62 चेंडूत 103 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात मुंबई संघ 8 विकेट्स गमावून केवळ 132 धावा करू शकला आणि 36 धावांनी सामना गमावला. कर्णधार रोहित शर्माने 39 आणि तिलक वर्माने 38 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT