MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

"धोनीच्या नावावर सीएसकेने चाहत्यांशी मोठा स्कॅम केला!", माजी दिग्गज क्रिकेटपटूचा चेन्नईच्या मॅनेजमेंटवर खळबळजनक आरोप

MS Dhoni Injury Scam IPL 2026: यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू एमएस धोनी दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही.

Manish Jadhav

Kris Srikkanth Slams CSK Management: यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू एमएस धोनी दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही. हंगाम सुरु होण्यापूर्वीच धोनीला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याच्या पुनरागमनाबाबत सातत्याने वेगवेगळ्या चर्चा रंगत राहिल्या. मात्र, तो मैदानावर परतलाच नाही आणि शेवटी चेन्नईचे या हंगामातील आव्हानही संपुष्टात आले.

आता चेन्नईचे चाहते धोनीला पुढच्या वर्षी खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण याचदरम्यान, भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू के. श्रीकांत यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनावर आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडवर जोरदार टीका केली. धोनीच्या नावावर सीएसके (CSK) व्यवस्थापनाने चाहत्यांची एका प्रकारे फसवणूक म्हणजेच 'स्कॅम' केला, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर चेन्नई सुपर किंग्सच्या या रणनीतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सीएसके व्यवस्थापनाने संपूर्ण हंगामात धोनीच्या पुनरागमनाची खोटी हाइफ निर्माण केली, पण प्रत्यक्षात तो एकाही सामन्यासाठी तंदुरुस्त होऊ शकला नाही, ही गोष्ट श्रीकांत यांना खटकली. के. श्रीकांत म्हणाले की, 'धोनी पुढच्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध होईल, असे व्यवस्थापन सतत सांगत राहिले.

एवढेच नाही तर चाहत्यांना आशा दाखवण्यासाठी त्यांनी धोनीचे नेटमधील सरावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केले आणि नंतर अचानक सांगण्यात आले की धोनी पुन्हा जखमी झाला. व्यवस्थापनाने हा मूर्खपणा वेळीच थांबवायला हवा होता. धोनी या पूर्ण हंगामात खेळू शकणार नाही, हे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट सांगायला हवे होते. जर त्यांनी तसे केले असते, तर चाहते मानसिकदृष्ट्या तयार राहिले असते.'

के. श्रीकांत यांनी पुढे कर्णधार ऋतुराज गायकवाडवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'ऋतुराज देखील प्रत्येक सामन्यापूर्वी धोनी पुढच्या मॅचमध्ये उपलब्ध असेल, असेच सांगत राहिला. या प्रकरणात संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती. धोनी पूर्ण हंगाम खेळणार नाही असे सांगितले असते, तर चाहत्यांनी ते स्वीकारले असते आणि ते पुढे गेले असते. प्रामाणिकपणे सांगायचे तर, या सामन्यांमध्ये मैदानावर कोणीही एमएस धोनीला मिस केले नाही. लोक फक्त एवढेच विचारत होते की तो ड्रेसिंग रुममध्ये का दिसत नाहीये. याव्यतिरिक्त तो सामना का खेळत नाहीये, असे कोणीही विचारत नव्हते. आता धोनीचा काळ संपला.'

आयपीएल 2026 मध्ये एकही सामना न खेळल्यामुळे चाहते आता धोनी पुढील वर्षी म्हणजेच 2027 च्या हंगामात खेळणार का, अशी आशा लावून बसले आहेत. यावर कर्णधार ऋतुराज गायकवाडने अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. मात्र, धोनीचा जुना सहकारी सुरेश रैनाने धोनीला पुढील हंगाम खेळण्याची विनंती केली आहे, ज्यावर 'थाला' धोनीने 'मी याबद्दल नक्कीच विचार करेन' असे सूचक उत्तर दिले. यामुळे धोनीच्या निवृत्तीबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sachin Tendulkar: सुनेच्या बॉलिंगवर क्रिकेटचा देव OUT, कॅच झेलताच लेकीनं केला जल्लोष; विमानातच रंगला सामना Watch Video

Elon Musk World First Trillionaire: एलन मस्क बनले जगातील पहिले 'ट्रिलियनेयर', संपत्ती अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त; 91 लाख कोटींचा टप्पा पार

सॅम्युअलच्या आत्महत्येचे गूढ: सोशल मीडियावरील बदनामी, पोलिसांचा दबाव की दिसतो त्यापेक्षा वेगळाच गुंता?

Cyber Crime: मैत्रीचा असाही 'घात'! सोशल मीडियावर ओळख वाढवून घातला कोटींचा गंडा; उत्तर प्रदेश पोलिसांकडून एकाला बेड्या

Social Media: 'लाईक्स' आणि 'फिल्टर्स'च्या आभासी जगात आपण स्वतःलाच हरवून बसतोय का? वाचा 'स्व-प्रतिमे'चे मानसशास्त्र!

SCROLL FOR NEXT