KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: केएल राहुल इंदूर कसोटीत खेळणार नाही? कर्णधार रोहित शर्मा देणार मोठा धक्का!

IND vs AUS 3rd Test, KL Rahul May Dropped: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळत आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 3rd Test, KL Rahul May Dropped: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळत आहे. सध्याच्या मालिकेत त्याने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान, टीम इंडियातून या खेळाडूला वगळण्याची मागणी सातत्याने होत आहे. आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत अपडेट दिले आहे.

केएल राहुल इंदूर कसोटीतून बाहेर?

सलामीवीर केएल राहुलची (KL Rahul) बॅट अजूनही तळपलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. अशा स्थितीत संघातून त्याला वगळण्याच्या चर्चेला उधान आले आहे.

काही लोक त्याच्या समर्थनात असले तरी व्यंकटेश प्रसादसह काही माजी खेळाडू सातत्याने त्याच्यावर टीका करत आहेत. व्यंकटेश प्रसादने मंडळावर पक्षपाताचा आरोपही केला.

आता इंदूरमध्ये होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलला संधी मिळणार की नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आपले म्हणणे मांडले

दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याचे वक्तव्य समोर आले आहे. बोर्डाच्या या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा हवाला देत इनसाइड स्पोर्टने सांगितले की, 'केएल राहुलच्या रिप्लेसची चर्चा दिल्ली कसोटीनंतर होणार होती. यातच त्याला कसोटी फॉरमॅटमध्येही उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आले आहे.

आता दिल्ली कसोटीत केएल राहुलला कर्णधार रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार बनवणार की शुभमन गिलला सलामीवीर म्हणून प्लेईंग-11 मध्ये संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.'

राहुलला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला

राहुलचा खराब फॉर्म पाहून काही क्रिकेट तज्ज्ञ त्याला संघातून वगळण्याचा सल्ला देत आहेत. 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा (Team India) सदस्य असलेल्या कृष्णमाचारी श्रीकांतने राहुलला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

राहुलला गेल्या 10 कसोटी डावांमध्ये केवळ 125 धावा करता आल्या आहेत. त्याला केवळ एकदाच 50 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे.

अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन किंवा सिलेक्टर्स त्याच्यावर विश्वास ठेवतील की नाही, हे सध्याच सांगणे कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT