KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

17 कोटी देऊनही KL राहुलचे भरले नाही मन; केली पगार वाढीची मागणी

कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खूप रोमांचक सामना खेळला गेला.

दैनिक गोमन्तक

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार, KL राहुल IPL 2022 मधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे तसेच राहुलला लखनौ सुपर जायंट्सने 17 कोटी रुपयांमध्ये ड्राफ्ट केले होते. गेल्या मोसमापर्यंत राहुल पंजाब किंग्ज टीमचा भाग होता. तिथे त्याला खेळण्यासाठी 11 कोटी मिळाले होते. सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू असूनही कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर राहुलने मानधन वाढवण्याची मागणी केली आहे. (KL Rahul has demanded a salary hike)

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खूप रोमांचक सामना खेळला गेला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर संपुर्ण मॅचचा निकाल लागला. सामना संपल्यानंतर राहुलने मुलाखतीत हसून सांगितले की, अशा सामन्यासाठी आणखी पैसे मिळायला हवे आहेत. राहुल म्हणाला की, 'अशा सामन्यासाठी मला कदाचित जास्त पैसे तुम्हाला द्यावे लागतील. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे बरेच सामने नाहीत, कदाचित काही शेवटच्या ओव्हरपर्यंत जातात.

या सामन्यातून शिकायला मिळाले धडे

केएल राहुल सांगतो की, या प्रकारच्या सामन्यात संघाला खूप काही शिकायला मिळाले आहे. तो म्हणाला की, 'टाइमआउट दरम्यान फक्त एकच गोष्ट म्हणजे तुमचे सर्वोत्तम चेंडू टाकण्याचा प्रयत्न करणे हा आहे. ज्या क्षणी आम्ही नियोजनापासून दूर गेलो, त्या क्षणी फलंदाजांना खेळणे सोपे झाले आहे. आमच्यासाठी हा चांगला धडा आहे, असे विजय संघाला एकत्र ठेवण्यास देखील मदत करतात.

हा मोसम उत्तम कर्णधार होता,

राहुल गेल्या दोन हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार होता, पण संघ एकदाही प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाहीये. आणि त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय सामन्यांमध्ये तो भारतीय संघाचा कर्णधार राहिला होता आणि संघाने मालिका 3-0 ने गमावली. या सगळ्यात सर्वांच्या नजरा त्यांच्या आयपीएलमधील कर्णधारपदाकडे लागल्या होत्या. येथे त्यांचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. अनेक प्रसंगी केएल राहुलने संघासाठी सामना बदलणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांचे खूप कौतुक केले गेले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

SCROLL FOR NEXT