Cricket kishor Petkar
क्रीडा

खोर्ली इलेव्हन उत्तर विभागीय विजेते

अंतिम लढतीत पेडणे संघावर ११३ धावांनी दणदणीत विजय

दैनिक गोमन्तक

पणजी : खोर्ली इलेव्हनने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अ गट क्रिकेट स्पर्धेत उत्तर विभागीय विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी पेडणे कल्चरल अँड स्पोर्टस क्लबचा ११३ धावांनी धुव्वा उडविला. सामना शनिवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. (Khorli XI North Division is winners in JCA cricket tournament)

निनाद पावसकर, दीपांशू शर्मा, दीपक पुनिया, ऋषभ यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर खोर्ली इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३०९ धावा केल्या. नंतर ओमकार घुले याच्या अर्धशतकानंतरही पेडणे संघाचा डाव १९६ धावांत संपुष्टात आला. राज्य विजेतेपदासाठी खोर्ली इलेव्हनसमोर दक्षिण विभागीय विजेत्या संघाचे आव्हान असेल.

संक्षिप्त धावफलक : खोर्ली इलेव्हन : ४५ षटकांत ५ बाद ३०९ (निनाद पावसकर ७७- ८५ चेंडू, ८ चौकार, २ षटकार, दीपांशू शर्मा ५५- ६९ चेंडू, ५ चौकार, दीपक पुनिया ८३- ५८ चेंडू, ४ चौकार, ५ षटकार, राहुल केणी २६, ऋषभ राठोड नाबाद ५४- ४१ चेंडू, ६ चौकार, कौशल चुरी १-३९, रोहन शेट्टी १-५३, ओमकार घुले १-३४, शुभम झा १-४०, ओम मडगावकर १-२५) वि. वि. पेडणे कल्चरल अँड स्पोर्टस क्लब : ४०.३ षटकांत सर्वबाद १९६ (ओमकार घुले ५६- ३६ चेंडू, ८ चौकार, १ षटकार, राजेश बेविनाकट्टी २८, वेदांग नाईक ३८, रोहन शेट्टी २५, विपुल देशप्रभू १९, दीपक पुनिया २-३५, मानस १-१४, ऋषभ राठोड २-४४, साहिल धुरी १-२५, महंमद शहीद २-३४, प्रणव साळुंखे २-१९).

मडकई युवक संघ अंतिम फेरीत

कमी धावसंख्येच्या लढतीत मडकई युवक संघाने कुडचडे यूथ क्लबवर तीन विकेट्सने विजय नोंदवून गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (JCA) अ गट क्रिकेट (Cricket) स्पर्धेत दक्षिण विभागीय अंतिम फेरी गाठली. सामना शनिवारी कांपाल (kampala) येथील भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar) मैदानावर झाला.

संक्षिप्त धावफलक : कुडचडे यूथ क्लब : ३२.५ षटकांत सर्वबाद ७८ (व्यंकट बिचे १८, राजदीप नाईक नाबाद १३, पचोरे किरण १५, महेश रायकर ३-२६, साईश नाईक ३-८, दीपक डांगी २-२३, सिद्धेश नाईक १-१२) पराभूत वि. मडकई युवक संघ : २३.३ षटकांत ७ बाद ८० (उन्मेष खेडेकर १७, दीपक डांगी नाबाद २३, व्यंकट बिचे १-८, राजदीप नाईक २-२२, सुदेश राणे ३-२७, प्रणव बिचे १-५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT