Kevin Pietersen | MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

Kevin Pietersen on MS Dhoni: धोनीची पहिली कसोटी विकेट होता की नाही? स्वत: पीटरसननेच Video शेअर करत केला मोठा खुलासा

Pranali Kodre

Kevin Pietersen dismiss claims that he was MS Dhoni’s first Test wicket: इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन मंगळवारी केलेले ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. त्याने या व्हिडिओतून माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने त्याची कसोटीत विकेट घेतली होती की नाही, याबद्दल खुलासा केला आहे.

झालंय असे की इंडियन प्रीमियर लीग 2017 मध्ये धोनी रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळत होता. त्यावेळी पीटरसन समालोचन करत होता. त्याने त्यावेळी पुण्याकडूनच खेळणाऱ्या मनोज तिवारीला इयर माईकवरून धोनीला सांगण्यास सांगितले की तो त्याच्यापेक्षा चांगला गोल्फर आहे.

त्यावर धोनीने उत्तर दिले होते की 'तो (पीटरसन) अजूनही माझी पहिली कसोटी विकेट आहे.' या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ अजूनही बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत येत असतो. तसेच तेव्हापासून पीटरसनला अनेकदा याबद्दल चाहत्यांकडून ऐकायलाही मिळते.

पीटरसनने समोर ठेवला पुरावा

अखेर तो धोनीची पहिली कसोटी विकेट असल्याचे सातत्याने ऐकून पीटरसन वैतागला असून त्याने मंगळवारी एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की 'मी धोनीची पहिली कसोटी विकेट असल्याच्या या सर्व दाव्यांना खोटे ठरवण्यासाठी लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यातील क्लिप मी शोधत आहे. मला तुम्हाला सांगण्यास आवडत नाहीये, पण मी त्याची पहिली कसोटी विकेट नव्हतो.'

त्यानंतर काहीवेळाने पीटरनने 2011 साली इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यातील एक क्लिप शेअर करत धोनीने त्याची विकेट घेतली नसल्याचे स्पष केले. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की 'पुरावे स्पष्ट आहेत. मी धोनीची पहिली विकेट नव्हतो. पण धोनीने चांगला चेंडू टाकला होता.'

झाले असे होते की त्या लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवशी दुसरा नवीन चेंडू घेतल्यानंतर भारताचा तात्कालिन कर्णधार धोनीने गोलंदाजी करण्यासाठी चेंडू हाती घेतला होता. त्यावेळी त्याने त्याच्या गोलंदाजीने केविन पीटरसनला संघर्ष करायला लावला होता.

दरम्यान, एका चेंडूवर त्याने पीटरसनच्या झेलबादसाठी अपीलही केले होते. त्यावेळी पंच बिली बाऊडेन यांनी पीटरसनला बाद करार दिला होता. पण पीटरसनने रिव्ह्यूची मागणी केलेली. ज्यात रिप्लेमध्ये पीटरसनची बॅट चेंडूला न लागता पॅडला लागलेला दिसली होती. त्यामुळे तिसऱ्या पंचांकडून निर्णय बदलण्यात आलेला आणि पीटरसनला नाबाद देण्यात आले होते.

पीटरसनने घेतलेली धोनीची विकेट

विशेष गोष्ट अशी की पीटरसनने बुधवारी अजून एक व्हिडिओ शेअर केली आहे. हा व्हिडिओ ज्यावेळी पीटरसनने धोनीची विकेट घेतलेली, त्या घटनेचा आहे.

ऑगस्ट 2007 मध्ये द ओव्हलवर झालेल्या कसोटी सामन्यात पीटरसनने धोनीला 92 धावांवर ऍलिस्टर कूककरवी झेलबाद केले होते.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की पीटरसनने सोशल मीडियावर हे व्हिडिओ शेअर केले असले, तरी मैदानाबाहेर त्याची धोनीबरोबर चांगली मैत्रीही आहे. 2016 साली आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून धोनीच्या नेतृत्वाखाली 4 सामने खेळला देखील होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT