आयएसएल फुटबॉल स्पर्धेत रविवारी मुंबई सिटीविरुद्ध गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना केरळा ब्लास्टर्सचे खेळाडू.

 

Dainik Gomantak

क्रीडा

केरळा ब्लास्टर्सचा गतविजेत्यांना हादरा

आयएसएल फुटबॉल अव्वल मुंबई सिटीचा सलग चार विजयानंतर पराभव

दैनिक गोमन्तक

पणजी:  इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेतील गतविजेत्या मुंबई सिटीला रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जबरदस्त हादरा बसला. उत्तरार्धात त्यांना दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यापूर्वीच केरळा ब्लास्टर्सने त्यांच्यावर दोन गोलची आघाडी घेत वर्चस्व राखले होते. अखेरीस अव्वल स्थानावरील संघास सामना 0-3 फरकाने गमवावा लागला.

केरळा (Kerala) ब्लास्टर्सविरुद्धच्या लढतीपूर्वी सलग चार सामने जिंकलेल्या मुंबई (Mumbai) सिटीने गुणतक्त्यात 15 गुणांसह अग्रस्थान मिळविले होते. त्यांना स्पर्धेतील सातव्या लढतीत दुसरा पराभव पत्करावा लागल्यामुळे गुणतक्त्यात मोठी आघाडी घेण्याचे डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे स्वप्न भंगले.

केरळा ब्लास्टर्सने सहा लढतीतील दुसरा सामना जिंकला. त्यामुळे त्यांचे गुणतक्त्यातील स्थानही सुधारले. नऊ गुणांसह ते पाचव्या स्थानी आले आहेत. सर्बियन इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने नियोजनबद्ध खेळत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यास नामोहरम केले.

केरळा ब्लास्टर्सला 27व्या मिनिटास आघाडी मिळाली. सहल समद याने मोसमातील दुसरा गोल नोंदवत संघाचे गोलखाते खोलले. उत्तरार्धाची सुरवात सनसनाटी ठरली. 47व्या मिनिटास स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याने स्पर्धेतील वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून केरळा ब्लास्टर्सची आघाडी 2-0 अशी वाढविली. 50व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्गे डायझ याला सेनेगलचा खेळाडू मुर्तदा फॉल याने मागून धोकादायक टॅकल केले.

सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे फॉलला मैदान सोडावे लागले व मुंबई सिटीचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर आले. यावेळी रेफरी प्रांजल बॅनर्जी यांनी पेनल्टी फटक्याची खूण केली. अर्जेंटिनाच्या डायझ याने पेनल्टी फटका अचूक मारताना वेगावर भर देत गोलरक्षक महंमद नवाझ याला चकविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT