East Bengal Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: केरळा ब्लास्टर्सने ईस्ट बंगालशी साधली बरोबरी

इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात ईस्ट बंगाल (East Bengal) संघ पहिल्या विजयापासून दूर राहिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात ईस्ट बंगाल (East Bengal) संघ पहिल्या विजयापासून दूर राहिला. केरळा ब्लास्टर्सने (Kerala Blasters) त्यांना 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. पूर्वार्धात दोन्ही संघ 1-1 गोलबरोबरीत होते. ईस्ट बंगालला 37व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉमिस्लाव म्रसेला (Tomislav Mersella) याने आघाडी मिळवून दिली, नंतर 44व्या मिनिटास स्पॅनिश खेळाडू अल्वारो वाझकेझ (Alvaro Vazquez) याच्या गोलमुळे केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधता आली.

केरळा ब्लास्टर्सची ही स्पर्धेतील तिसरी बरोबरी ठरली. त्यांचे पाच लढतीनंतर आता एफसी गोवा इतकेच सहा गुण झाले आहेत. मात्र गोलसरासरीत सरस असल्याने केरळचा संघ सहाव्या क्रमांकावर आला आहे. अजूनही स्पर्धेत विजय न नोंदविलेल्या ईस्ट बंगालची ही सहा लढतीतील तिसरी बरोबरी ठरली. तीन गुणांसह कोलकात्याचा हा संघ शेवटच्या अकराव्या क्रमांकावर आहे.

एफसी गोवाच्या सांघिक भावनेचे प्रशिक्षकांकडून कौतुकसामन्याच्या 15व्या मिनिटास नाट्य घडले. अल्वारो वाझकेझ याने गोल केल्यानंतर रेफरीने त्यास मान्यता दिली व केरळा ब्लास्टर्सचे खेळाडू आनंद साजरा करत असताना ईस्ट बंगालने निषेध नोंदविला. त्यावेळी रेफरी आर. व्यंकटेश यांनी आपल्या साहाय्यकाशी चर्चा करून गोल नाकारला व फ्रीकिक फटक्याची खूण केली. विश्रांतील आठ मिनिटे बाकी असताना ईस्ट बंगालने आघाडी घेतली. राजू गायकवाडच्या दूरवरील थ्रो-ईनवर टॉमिस्लावने भेदक हेडिंग साधले. विश्रांतीला एक मिनिट असताना कर्णधार जेसेल कार्नेरोच्या असिस्टवर वाझकेझच्या गोलमुळे केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधता आली. यावेळी वाझकेझचा फटका ईस्ट बंगालचा बचावपटू म्रसेला याला आपटून नेटमध्ये गेला. स्वयंगोलची नंतर सुधारणा करत वाझकेझच्या नावावर गोलची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drowning Death: कुळेत आणखी दोघांचा बुडून मृत्‍यू, दोघेही मूळ कर्नाटकचे; राज्यात गेल्‍या 21 दिवसांत 12 जणांचा दुर्दैवी अंत

ED Raid Goa: 'साळगावकर' समूहाची 1,023.85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, अवैध लोहखनिज उत्खननप्रकरणी 'ईडी'ची कारवाई

Horoscope: बुधाच्या राशीबदलाचा मोठा प्रभाव! 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळणार मोठे यश

Marwar History Rathore Dynasty: औरंगजेबालाही झुकवणारा रणधुरंधर! दुर्गादास राठोडांनी 30 वर्षे लढून वाचवले 'मारवाड'चे स्वातंत्र्य

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

SCROLL FOR NEXT