ISL football

 

Dainik gomantak

क्रीडा

केरळा ब्लास्टर्स सात लढती अपराजित, जमशेदपूरविरुद्ध 1-1 गोलबरोबरी

केरळा ब्लास्टर्सने सलग सात लढतीत चार बरोबरी व तीन विजय अशी कामगिरी नोंदविली आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : केरळा ब्लास्टर्सने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (football) स्पर्धेच्या आठव्या मोसमातील अपराजित मालिका रविवारीही कायम राखली. त्यांनी पिछाडीवरून जमशेदपूर एफसीला 1-1 गोलबरोबरीत रोखून सलग सात सामने न गमावण्याचा पराक्रम साधला.

केरळा ब्लास्टर्स व जमशेदपूर यांच्यातील सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. स्कॉटलंडचा आघाडीपटू ग्रेग स्टुअर्ट याच्या डाव्या पायाच्या सणसणीत फ्रीकिक फटक्यावर जमशेदपूर एफसीने 14व्या मिनिटास आघाडी मिळविली. स्टुअर्टचा हा स्पर्धेतील आठ लढतीत पाचवा गोल ठरला. सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्या खेळाडूंत तो आता संयुक्त दुसरा आहे. सामन्याच्या 27व्या मिनिटास सहल अब्दुल समद याने केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधून देताना प्रतिस्पर्धी बचावफळी भेदली. या 24 वर्षीय मध्यरक्षकाने सलग तिसऱ्या लढतीत गोल करून सातत्य प्रदर्शित केले. त्याचा हा यंदाचा एकंदरीत चौथा गोल ठरला.

केरळा (Kerala) ब्लास्टर्सने सलग सात लढतीत चार बरोबरी व तीन विजय अशी कामगिरी नोंदविली आहे. त्यांची, तसेच जमशेदपूरची ही स्पर्धेतील प्रत्येकी आठ लढतीतील चौथी बरोबरी ठरली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे त्यांचे आता समान 13 गुण झाले आहेत. अव्वल स्थानावरील मुंबई सिटीपेक्षा त्यांचे दोन गुण कमी आहे. एक गोल जास्त नोंदविल्यामुळे गुणतक्त्यात जमशेदपूर संघ दुसऱ्या, तर केरळा ब्लास्टर्स तिसऱ्या स्थानी आहे.

नॉर्थईस्टचे मुंबई सिटीस आव्हान

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सोमवारी (ता. 27) गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान असेल. अव्वल स्थानावरील मुंबई सिटीचे सध्या सात लढतीतून 15 गुण आहेत, त्यांना मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सने पराभवाचा झटका दिला होता. नॉर्थईस्ट युनायटेड संघ आठ सामने खेळला असून त्यांनी फक्त सात गुणांची कमाई केली आहे. अगोदरच्या लढतीत त्यांना एटीके मोहन बागानकडून 3-2 फरकाने निसटती हार पत्करावी लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT