Kaushal Hattangadi Pillar of Goa cricket
Kaushal Hattangadi Pillar of Goa cricket  Dainik Gomantak
क्रीडा

गोमंतकीय क्रिकेटचा`कौशल्य`पूर्ण आधारस्तंभ

किशोर पेटकर

पणजी : युवा फलंदाज कौशल हट्टंगडी ( Koushal Hattangadi) याने दोन मोसमापूर्वी देशांतर्गत ज्युनियर क्रिकेटमध्ये (Cricket) जोमदार फलंदाजी केली, आगामी मोसमातही मध्यफळीतील डावखुरा फलंदाज गोव्यासाठी (Goa) आधारस्तंभ असेल. युवा विश्वकरंडक स्पर्धेच्या अनुषंगाने त्याच्यासाठी मोसम खूपच महत्त्वाचा असेल.

अहमदाबाद येथे होणाऱ्या 19 वर्षांखालील विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी कौशलची गोवा संघ कर्णधारपदी निवड झाली आहे. एलिट क गटात मुंबई, आसाम, हैदराबाद, राजस्थान, तसेच त्रिपुरा हे संघ आहेत. कौशलने फलंदाजीत सातत्य राखल्यास तो राष्ट्रीय ज्युनियर निवड समितीचे लक्ष वेधू शकतो. शरथ श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय ज्युनियर निवड समिती आगामी 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा नजरेसमोर ठेवूनच विनू मांकड करंडक स्पर्धेकडे पाहील हे स्पष्टच आहे. विश्वकरंडक पुढील वर्षी सुरवातीस वेस्ट इंडीजमध्ये नियोजित आहे.

कोविड-19 महामारीमुळे 2020-21 मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्युनियर स्पर्धा झाल्या नाही. यंदा ज्युनियर क्रिकेटपटू स्पर्धात्मक मैदानावर पुनरागमन करत आहेत. 2019-20 मोसमात कौशलने विनू मांकड करंडक एकदिवसीय, तसेच कुचबिहार करंडक चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत कौतुकास्पद फलंदाजी केली होती. तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी ओळखले जाणारे कर्नाटकचे राजेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली कौशलची फलंदाजी बहरली.

गुणवत्ता व क्षमतेची साक्ष

दोन मोसमापूर्वी गोव्याच्या प्लेट गटातील संघ कमजोर होते, पण कौशलने तुल्यबळ चंडीगडविरुद्ध दोन्ही डावात केलेली फलंदाजी त्याची गुणवत्ता आणि क्षमतेची साक्ष देणारी होती. चंडीगडमध्ये गोलंदाजांना साथ देणाऱ्या वातारणात गोव्याची फलंदाजी कोलमडली. पहिल्या डावात गोव्याचा डाव 232 धावांत आटोपला, त्यात कौशलने 173 चेंडूंत 22 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 148 धावांचे योगदान दिले. मोठ्या पिछाडीनंतर गोव्याची दुसऱ्या डावातही दाणादाण उडाली. कौशलच्या झुंजार फलंदाजीमुळे प्रतिकुल परिस्थितीत गोव्याने 6 बाद 114 धावा करून सामना अनिर्णित राखला. कौशलने कर्णधारपदाची जबाबदारी पेलताना 109 चेंडूंत नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने पराभव टाळणारी नाबाद 72 धावांची बहुमूल्य खेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

Goa Crime News: शारीरिक संबधास नकार दिल्याने पत्नीचा खून; पाच वर्षानंतर पती दोषी

Alcohol Seized : महाराष्‍ट्रातून गोव्‍यात आणलेली ८.४१ लाखांची दारू पकडली

Panaji News : बाबूशला पंच रबरस्टँप म्हणून हवेत; सिसील-फ्रान्सिस यांचा आरोप

Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

SCROLL FOR NEXT