bandodkar trophy cricket Dainik Gomantak
क्रीडा

करिमाबादच्या विजयात तुनीषची तुफानी फटकेबाजी

बांदोडकर करंडक क्रिकेटमध्ये एमसीसी पराभूत, तर साळगावकर क्लबची जीनोवर मात

किशोर पेटकर

पणजी : तुनीष सावकार याच्या तुफानी फटकेबाजीमुळे बांदोडकर करंडक टी-20 साखळी क्रिकेट स्पर्धेत करिमाबाद क्रिकेट क्लबला रोमहर्षक विजय नोंदविता आला. 99 धावांवर नाबाद राहिलेल्या तुनीषने विजेश प्रभुदेसाईच्या शेवटच्या षटकात 21 धावा काढल्या. त्यामुळे एमसीसी संघाला सामना तीन विकेट्स आणि एक चेंडू राखून गमवावा लागला.

पणजी जिमखान्याच्या या स्पर्धेतील सामना सोमवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला. सकाळच्या सत्रात ईशान गडेकर याच्या नाबाद 60 धावांच्या बळावर साळगावकर क्रिकेट क्लबने जीनो स्पोर्टस क्लबला सात विकेट्स राखून पराजित केले. ईशानने सागर मिश्रा (नाबाद 30) याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी 77 धावांची अभेद्य भागीदारी केली.

एमसीसी संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 190 धावा केल्या. नीतिशकुमार रेड्डी (59) व विशंबर काहलोन (नाबाद 66) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या 116 धावांच्या भागीदारीमुळे एमसीसी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. करिमाबाद संघ आव्हानाचा पाठलाग करत असताना तुनीष व कश्यप बखले (54) यांनी चौथ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली, मात्र नंतर त्यांची घसरगुंडी उडाली.

शेवटच्या षटकात करिमाबादला विजयासाठी 21 धावांची गरज होती. विजेशच्या षटकातील पहिल्या चेंडूवर तुनीषने एक धाव घेतली. दुसरा चेंडू वाईड ठरला, पण अतिरिक्त धाव घेताना सोहम पानवलकर धावबाद झाला. नंतर तुनीषने अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर सलग षटकार खेचत करिमाबादचा विजय पक्का केला. पाचव्या चेंडूवर त्याने एक धाव घेत संघाचा विजय झळकावला, मात्र तो शतकापासून एक धाव दूर राहिला. त्याने 48 चेंडूंत नाबाद खेळीत आठ चौकार व आठ षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

जीनो स्पोर्टस क्लब : 14.1 षटकांत सर्वबाद 98 (समर दुभाषी 25, दीपक खत्री 35, गौरीश कांबळी 13, मोहित रेडकर 12, शुभम तारी 3-11, समीत आर्यन मिश्रा 4-33, देवदत्त चोडणकर 1-15, सागर मिश्रा 1-16, सुजित नायक 1-23) पराभूत वि. साळगावकर क्रिकेट क्लब : 12.5 षटकांत 3 बाद 99 (ईशान गडेकर नाबाद 60, सागर मिश्रा नाबाद 30, मोहित रेडकर 1-15, दीपक खत्री 2-7).

एमसीसी : 20 षटकांत 4 बाद 190 (दिगेश रायकर 27, वैभव गोवेकर 31, नीतिशकुमार रेड्डी 59, विशंबर काहलोन नाबाद 66, दीपराज गावकर 1-56, लकमेश पावणे 1-42, वेदांत नाईक 1-21, रिषभ चौहान 1-19) पराभूत वि. करिमाबाद क्रिकेट क्लब : 19.5 षटकांत 7 बाद 191 (कुलदीप गेही 13, कश्यप बखले 54, तुनीष सावकार नाबाद 99, हेरंब परब 2-29, नीतिशकुमार रेड्डी 1-23, विजेश प्रभुदेसाई 1-62, साईश कामत 2-18).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT