Kane Williamson Dainik Gomantak
क्रीडा

हाय रे किस्मत! RR ने पहिल्यांदा SRH हरवले, विल्यमसनला आयपीएलनं केलं क्लीन बोल्ड

सनरायझर्स हैदराबादचा (Hyderabad) कर्णधार केन विल्यमसनला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. काल सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल यांच्यात सामना झाला. ज्यामध्ये राजस्थानने हैद्राबादवर दणदणीत विजय मिळवला. मात्र दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. एमसीए स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात सनरायझर्सला रॉयल्सकडून 61 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (Kane Williamson was fined Rs 12 lakh for slow over rate in the match against Rajasthan Royals)

दरम्यान, "29 मार्च रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे," असे आयपीएलने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

"आयपीएलच्या किमान ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेनुसार या हंगामातील हा संघाचा पहिला गुन्हा आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे," असेही त्यात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT