Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा

Indian Cricket Team: 2007 चा टी-20 विश्वचषक भारताला जिंकून देण्यात या खेळाडूचा मोठा वाटा होता. या विश्वचषकानंतर हा खेळाडू टीम इंडियाचा भाग बनला नसला तरी.

दैनिक गोमन्तक

Indian Cricket Team: टीम इंडियाचे पुढील मिशन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणारी कसोटी मालिका आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

टीम इंडियाच्या एका खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. 2007 चा टी-20 विश्वचषक भारताला जिंकून देण्यात या खेळाडूचा मोठा वाटा होता. या विश्वचषकानंतर हा खेळाडू टीम इंडियाचा भाग बनला नसला तरी.

टीम इंडियाचा हा खेळाडू निवृत्त झाला

2007 च्या T20 विश्वचषकाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांना लगेच जोगिंदर शर्माचे नाव आठवते. जोगिंदर शर्मानेच फायनल मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचे षटक टाकून टीम इंडियाला (Team India) वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते.

जोगिंदर शर्माने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे.

छोट्या कारकिर्दीत मोठे नाव कमावले

39 वर्षीय जोगिंदर शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत टीम इंडियासाठी एकूण 4 टी-20 आणि 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये, जोगिंदर शर्माने 4.6 इकॉनॉमीसह धावा देत 1 बळी घेतला.

त्याचवेळी, टी-20 फॉरमॅटमध्ये जोगिंदर शर्माने 9.52 च्या इकॉनॉमीसह धावा देत एकूण 4 विकेट घेतल्या. याशिवाय, जोगिंदर शर्माने 16 आयपीएल (IPL) सामनेही खेळले आहेत. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग होता.

2007 T20 विश्वचषकाचा हिरो

2007 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या होत्या. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या सहा चेंडूत 13 धावांची गरज होती. कर्णधार एमएस धोनीने डावातील शेवटचे षटक जोगिंदर शर्माला दिले. आणि त्यानंतर जोगिंदरने फॉर्मात असलेल्या मिसबाह-उल-हकला बाद करुन भारताला विश्वविजेता बनवले. हा सामना जोगिंदर शर्माच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सामना होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT