Joe Root Century PTI
क्रीडा

Joe Root Century: रुट रोहितसेनेला नडला! टीम इंडियाविरुद्ध 10 वे शतक झळकावत स्मिथला टाकलं मागे

Joe Root Century Record: इंग्लंडच्या जो रुटने रांचीमध्ये सुरू असेलल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध कसोटी शतक झळकावत मोठा विक्रम केला आहे.

Pranali Kodre

Joe Root Century during India vs England 4th Test in Ranchi:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रांचीमध्ये सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंड संघाकडून जो रुटने शतकी खेळी करत मोठे विक्रम केले आहेत.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इंग्लंडने 112 धावांवरच 5 विकेट्स गमावल्या. अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जो रुटने एक बाजू भक्कम सांभाळली.

त्याला आधी बेन फोक्सबरोबर सहाव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी झाली. पण फोक्स 47 धावांवर बाद झाल्यानंतर ऑली रॉबिन्सनने त्याची चांगली साथ दिली. त्यांच्यातील भागीदारीदरम्यान जो रुटने त्याचे शतक पूर्ण केले. त्याने 84 व्या षटकात 219 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले.

पहिल्या दिवस अखेर रुटच्या शतकामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 90 षटकात 7 बाद 302 धावा केल्या आहेत. रुट 106 धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच ऑली रॉबिन्सन 31 धावांवर नाबाद आहे.

भारताविरुद्ध रुटची बॅट तळपली

दरम्यान, रुटचे हे भारताविरुद्ध कसोटीतील 10 वे शतक ठरले. त्यामुळे भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुटने स्टीव्ह स्मिथला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला आहे. स्मिथने कसोटीत भारताविरुद्ध 9 शतके केली आहेत.

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीलही रुटचे हे भारताविरुद्धचे 13 वे शतक आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह स्मिथ आहे. या दोघांनीही भारताविरुद्ध आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी 14 शतके केली आहेत.

भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू -

  • 10 शतके - जो रुट (52 डाव)

  • 9 शतके - स्टीव्ह स्मिथ (37 डाव)

  • 8 शतके - रिकी पाँटिंग (51 डाव)

  • 8 शतके - विव रिचर्ड्स (41 डाव)

  • 8 शतके - गॅरी सोबर्स (30 डाव)

रुटचे 31 वे शतक

दरम्यान, रुटचे हे कारकिर्दीतील 31 वे कसोटी शतक ठरले. त्यामुळे सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुटने मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉल यांना मागे टाकले आहे.

हेडन आणि चंद्रपॉल यांनी 30 कसोटी शतके केली आहेत. रुट आता या यादीत 14 व्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे सध्या 13 खेळाडू आहेत. यात इंग्लंडचा दिग्गज ऍलिस्टर कूक आहे. कूकने ३३ शतके केली आहेत.

तसेच सध्या सक्रीय असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक कसोटी शतके केन विलियम्सन आणि स्टीव्ह स्मिथच्या नावावर आहेत. या दोघांनी प्रत्येकी 32 शतके केली आहेत. तसेच रुट आता 31 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. विराट 29 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT