Jhulan Goswami Dainik Gomantak
क्रीडा

Jhulan Goswami करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

International Cricket: भारताची अनुभवी महिला गोलंदाज झुलन गोस्वामी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

दैनिक गोमन्तक

International Cricket: भारताची अनुभवी स्टार महिला गोलंदाज झुलन गोस्वामी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. झुलन पुढील महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे. त्यासाठी तिने लंडनमधील लॉर्ड्सचे ऐतिहासिक स्टेडियम निवडले आहे. झुलन 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्सवर खेळल्या जाणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या (England) आगामी मालिकेसाठी झुलनची शुक्रवारी एकदिवसीय संघात निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, झुलनला 2022 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली होती. तिने श्रीलंकेविरुद्धची (Sri Lanka) वनडे मालिका खेळली नव्हती. झुलन या वर्षी मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये (New Zealand) झालेल्या वनडे विश्वचषकादरम्यान भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळली होती. 2018 पासून तिने T20 सामना खेळलेला नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये तिने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

दुसरीकडे, झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) सर्व फॉरमॅटमध्ये महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज म्हणून तिची कारकीर्द संपवणार आहे. सध्या तिच्याकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये 352 विकेट्स आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. इंग्लंड दौऱ्याची सुरुवात 10 सप्टेंबरपासून टी-20 मालिकेने होईल, तर एकदिवसीय मालिका 18 सप्टेंबरपासून खेळवली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT