Jharkhand Dainik Gomantak
क्रीडा

Hockey Tournament: गतविजेत्या झारखंडची विजयी सलामी

गतविजेत्या झारखंडने (Jharkhand) 12 व्या राष्ट्रीय सबज्युनियर मुलांच्या हॉकी स्पर्धेत विजयी सलामी देताना शुक्रवारी उत्तराखंडवर 5-1 फरकाने विजय नोंदविला.

किशोर पेटकर

पणजी: गतविजेत्या झारखंडने 12 व्या राष्ट्रीय सबज्युनियर मुलांच्या हॉकी स्पर्धेत विजयी सलामी देताना शुक्रवारी उत्तराखंडवर 5-1 फरकाने विजय नोंदविला. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील ॲस्ट्रो टर्फ मैदानावर सुरू आहे. अन्य लढतीत हरियाणाने (Haryana) छत्तीसगडला 4-0 असे, उत्तर प्रदेशने (Uttar Pradesh) बंगालला 6-1 असे हरविले, तर ओडिशाने आंध्र प्रदेशचा 18-0 असा धुव्वा उडविला. (Jharkhand defeated Uttarakhand in the 12th National Sub-Junior Boys Hockey Championship)

अ गट लढतीत झारखंडच्या बिशाल लाक्रा याने हॅटट्रिक नोंदविली. याशिवाय कर्णधार अमृत तिर्की व अदिसान मिंज यांनी प्रत्येकी एक गोल केला. उत्तराखंडचा एकमात्र गोल विशाल कुमारने नोंदविला. ब गट लढतीत अमन सिंग, राहुल, नितीन व सुनील यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलमुळे हरियानाने छत्तीसगडला सहजपणे हरविले. क गटात बंगालविरुद्धच्या विजयात उत्तर प्रदेशसाठी महंमद झैद खान याने दोन, तर कर्णधार मनोज यादव, अजित यादव, अभिषेक यादव, रझा अली यांनी प्रत्येकी एक गोल केला. कर्णधार रोहित कुजूर याने बंगालची पिछाडी कमी केली.

ई गट लढतीत ओडिशाच्या (Odisha) दणदणीत विजयात योजिन मिंझ व इरेंगबाम रोहित सिंग यांनी प्रत्येकी पाच गोल झळकावले. आर्यन शेस याने चार, कर्णधार अरबिन टोप्पो याने दोन, तसेच बिलकन ओरम व देवनाथ नन्वार यांनी प्रत्येकी एक गोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT