Jasprit Bumrah X/BCCI
क्रीडा

SA vs IND: बुमराहचा भेदक मारा, द. आफ्रिकेचा अर्धा संघ केला आऊट! 'या' 3 रेकॉर्ड लिस्टमध्येही नोंदवलं नाव

Jasprit Bumrah: केपटाऊन कसोटीत भारताकडून दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेत 3 खास विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd Test at Cape Town, Jasprit Bumrah 6 Wickets:

केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेचा दुसरा सामना बुधवारपासून सुरु झाला आहे. न्युलँड्स स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले असून दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ७९ धावांचे आव्हान ठेवले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 36.5 षटकात 176 धावांवर संपला. मात्र, पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकने 98 धावांची पिछाडी स्विकारलेली असल्याने त्यांना भारतासमोर विजयासाठी 79 धावांचे आव्हान ठेवता आले.

दरम्यान, दुसऱ्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने १३.५ षटके गोलंदाजी करताना ६१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याची कसोटीत ५ विकेट्स घेण्याची ही नववी वेळ आहे. त्यामुळे त्याने काही विक्रमांना गवसणी घातली आहे.

शमी, झहीर यांना टाकले मागे

बुमराहने दक्षिण आफ्रिकेत आत्तापर्यंत ८ कसोटी सामने खेळताना ३८ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो आता दक्षिण आफ्रिकेत कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने मोहम्मद शमी आणि झहीर खान यांना मागे टाकले आहे. शमीने दक्षिण आफ्रिकेत ८ सामन्यांत ३५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच झहीरने ८ सामन्यांत ३० विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. अनिल कुंबळेने दक्षिण आफ्रिकेत १२ सामन्यांत ४५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर जवागल श्रीनाथ असून त्यांनी दक्षिण आफ्रिकेत ८ सामन्यांत ४३ विकेट्स घेतल्या आहेत.

जवागल श्रीनाथ यांची बरोबरी

बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे त्याने भारताकडून दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ यांची बरोबरी केली आहे.

श्रीनाथ यांनीही दक्षिण आफ्रिकेत तीनवेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ वेंकटेश प्रसाद एस श्रीसंत आणि मोहम्मद शमी हे तिघे आहेत. या तिघांनीही दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी २ वेळा कसोटीत एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

केपटाऊनमध्ये बुमराहचे शानदार कामगिरी

केपटाऊनधील न्यूलँड्स स्टेडियमवर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेबाहेरच्या म्हणजेच परदेशी गोलंदाजांमध्ये बुमराहने दुसरे स्थान मिळवले आहे. त्याने या मैदानावर आत्तापर्यंत ३ सामने खेळताना १८ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडचे कॉलिन ब्लिथ आहेत. त्यांनी ४ सामन्यांत २५ विकेट्स या मैदानावर घेतल्या आहेत.

तसेच या विक्रमाच्या यादीत ब्लिथ आणि बुमराहच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर 17 विकेट्ससह ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न, चौथ्या क्रमांकावर 16 विकेट्ससह इंग्लंडचा जेम्स अँडरसन आणि पाचव्या क्रमांकावर 15 विकेट्ससह इंग्लंडचे जॉनी ब्रिग्स आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT