Jamshedpur Fc won in Reliance Foundation Development League Football  Dainik Gomantak
क्रीडा

RFDL Football Competition : जमशेदपूरकडून एफसी गोवाचा धुव्वा

हैदराबादला नमवून बंगळूरची विजयी आगेकूच

Kishor Petkar

पणजी: जमशेदपूर एफसीने रविवारी रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत ‘पंचतारांकित’ विजय नोंदविताना एफसी गोवाचा 5-1 फरकाने धुव्वा उडविला. अन्य एका सामन्यात भरपाई वेळेतील गोलमुळे बंगळूर एफसीने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करताना हैदराबाद एफसीचे कडवे आव्हान 2-1 फरकाने परतावून लावले. (Jamshedpur Fc won in Reliance Foundation Development League Football)

नागोवा येथील मैदानावर एफसी गोवा संघ जमशेदपूरच्या धडाकेबाज खेळासमोर निष्प्रभ ठरला. त्यांच्या फिजाम विकास सिंग याने सहाव्या मिनिटास पहिला गोल केला, नंतर 11व्या मिनिटास के. साकिर अली याने आघाडी वाढविली. 14व्या मिनिटाल मल्लिकजान कालेगर याने एफसी गोवाची पिछाडी कमी केली. 40व्या मिनिटास लालरुआतमाविया याच्या गोलमुळे जमशेदपूरची आघाडी भक्कम झाली. 78व्या मिनिटास सोरोखाईबाम मेतेई याच्या गोलनंतर 90+4व्या मिनिटास विकास सिंग याने पेनल्टीवर गोल करून जमशेदपूरच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. त्यामुळे या अपराजित संघाचे आता तीन लढतीतून सात गुण झाले. एफसी गोवास सलग दुसरा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांचे तीन लढतीनंतर तीन गुण कायम राहिले.

बाणावली येथील मैदानावर 90+2व्या मिनिटास मोनिरुल मोल्ला याने केलेल्या गोलमुळे बंगळूर एफसीने स्पर्धेतील तिसरा विजय नोंदवत गुणसंख्या नऊवर नेली. 14व्या मिनिटास राहुल राजू याने त्यांना आघाडी मिळवून दिल्यानंतर 46व्या मिनिटास अमृतपाल सिंग याच्या गोलमुळे हैदराबादने बरोबरी साधली होती. हैदराबादचा हा दुसरा पराभव ठरला, त्यामुळे तीन लढतीनंतर त्यांच्या तीन गुणांत फरक पडला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT