Kerala Blaster

 

Dainik gomantak

क्रीडा

केरळा ब्लास्टर्ससमोर जमशेदपूरचे आव्हान, टिळक मैदानावर रंगणार सामना

केरळा ब्लास्टर्सने रविवारी जमशेदपूर संघाला हरवल्यास त्यांना 15 गुणांसह अग्रस्थानावरील मुंबई सिटीस गाठता येईल

दैनिक गोमन्तक

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमातील बॉक्सिंग डे लढतीत रविवारी (ता. 26) विजयी धडाका राखलेल्या केरळा ब्लास्टर्स संघासमोर जमशेदपूर एफसीचे आव्हान असेल. सामना वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल.

इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील केरळा (Kerala) ब्लास्टर्स संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सलग सहा सामने ते अपराजित आहेत. मागील लढतीत त्यांनी चेन्नई (Chennai) एफसीला 3-0 फरकाने हरवले होते, तर त्यापूर्वी याच फरकाने मुंबई (Mumbai) सिटीवर मात केली होती. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर एफसी संघात सातत्याचा अभाव आहे. ओडिशा एफसीला 4-0 फरकाने हरवल्यानंतर त्यांना मागील लढतीत बंगळूर एफसीने गोलशून्य बरोबरीत रोखले.

केरळा ब्लास्टर्सने रविवारी जमशेदपूर संघाला हरविल्यास त्यांना 15 गुणांसह अग्रस्थानावरील मुंबई सिटीस गाठता येईल. सात लढतीतून प्रत्येकी 3 विजय व बरोबरी आणि एका पराभवासह त्यांचे सध्या 12 गुण आहेत. जमशेदपूर एफसीचेही 12 गुण आहे. त्यामुळे विजय नोंदवल्यास त्यांनाही संयुक्त अग्रस्थानाची संधी राहील. जमशेदपूरने स्पर्धेत आतापर्यंत 13 गोल केले असून केरळा ब्लास्टर्सने त्यांच्यापेक्षा एक गोल कमी नोंदवला आहे.

आमचे खेळाडू खूप मेहनत घेत आहे. त्यामुळे कामगिरीत सातत्य आहे. मात्र, रविवारच्या लढतीत कडवा प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे अधिक मेहनत घ्यावी लागेल, असे केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक व्हुकोमानोविच यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT