Rudrankksh Patil  Dainik Gomantak
क्रीडा

Rudrankksh Patil चा नवा विक्रम! आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण

ISSF World Championships 2022: इजिप्तची राजधानी कैरो येथील आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याचा नेमबाज रुद्राक्ष पाटीलनं नवा नवा विक्रम केला आहे.

दैनिक गोमन्तक

इजिप्तची (Egypt) राजधानी कैरो (Cairo) येथील आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याचा (Thane) नेमबाज रुद्रांक्ष (Rudrankksh Patil) पाटीलनं नवा पराक्रम केला आहे. या स्पर्धेतील पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात त्यानं सुवर्णपदक पदक जिंकलं.

रुद्रांक्ष पाटीलच्या या अप्रतिम कामगिरीनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारताची मान गर्वानं उंचावली आहे. महत्वाचं म्हणजे, भारताचा स्टार नेमबाज अभिनव बिंद्रानंतर (Abhinav Bindra) 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकणारा रुद्रांक्ष पाटील दुसरा खेळाडू ठरला आहे.

अभिनव बिंद्रानं 2006 मध्ये हा पराक्रम केला होता. दोन आठवड्यांपूर्वी रुद्रांक्ष पाटीलनं नॅशनल गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. या स्पर्धेत त्यानं अर्जुन बाबुतचा पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT