ISL: Hyderabad FC won match by 3-1 against Mumbai city  Dainik Gomantak
क्रीडा

गतविजेत्या मुंबई सिटीस हैदराबादचा धक्का

स्पर्धेतील गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला शनिवारी पराभवाचा धक्का बसला आहे . स्पर्धेच्या आठव्या मोसमात त्यांना हैदराबाद एफसीने पिछाडीवरून येत 3-1 हरवले .

दैनिक गोमन्तक

इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेतील गतविजेत्या मुंबई सिटी एफसीला शनिवारी पराभवाचा धक्का बसला आहे . स्पर्धेच्या आठव्या मोसमात त्यांना हैदराबाद एफसीने पिछाडीवरून येत 3-1 हरवले . सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला.(ISL: Hyderabad FC won match by 3-1 against Mumbai city)

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघ 1-1 गोलबरोबरीत होते. मोरोक्कन मध्यरक्षक अहमद जाहू याने सहाव्या मिनिटास मुंबई सिटीस आघाडी मिळवून दिल्यानंतर 13व्या ब्राझीलियन जुवाव व्हिक्टर याने पेनल्टी फटक्यावर हैदराबादला बरोबरी साधून दिली. नायजेरियन 37 वर्षीय आघाडीपटू बार्थोलोमेव ओगबेचे याने 53व्या मिनिटास हैदराबाद एफसीला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. गतमोसमात मुंबई सिटीकडून खेळलेल्या ओगबेचे याचा हा आयएसएलमधील वैयक्तिक 36वा गोल ठरला. 19 वर्षीय युवा आघाडीपटू रोहित दानू याने 82व्या मिनिटास हैदराबादची आघाडी 3-1 अशी मजबूत केली. सामन्यातील बदली खेळाडू रोहितचा हा आयएसएल स्पर्धेतील पहिलाच गोल ठरला.

मानोलो मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादचा हा यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. अगोदरच्या लढतीत चेन्नईयीनकडून 0-1 फरकाने निसटती हार स्वीकारलेल्या हैदराबादचे आता दोन लढतीतून तीन गुण झाले आहेत. मुंबई सिटीने मागील लढतीत एफसी गोवाचा 3-0 फरकाने धुव्वा उडविला होता, पण शनिवारी हैदराबादच्या नियोजनबद्ध खेळासमोर डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची मात्रा चालली नाही व त्यांना पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे तीन गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT