ISL football Dainik Gomantak
क्रीडा

ISL football: हैदराबाद एफसी अन् मुंबई सिटी यांच्यातील सामना ठरला उत्कंठावर्धक

हैदराबादची मुंबई सिटीविरुद्ध 3-3 गोलबरोबरी

दैनिक गोमन्तक

गतविजेता हैदराबाद एफसी आणि माजी विजेते मुंबई सिटी यांच्यातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामना आज (रविवारी) उत्कंठावर्धक ठरला. एका गोलच्या पिछाडीवरून हैदराबादने 3-3 गोलबरोबरीमुळे गुणाची कमाई केली.

(ISL football Match between Hyderabad FC and Mumbai City ties)

चिंग्लेन्साना सिंग याच्या स्वयंगोलमुळे 23 व्या मिनिटास मुंबई सिटीला आघाडी मिळाली, पण पूर्वार्धाच्या भरपाई वेळेस हैदराबादने बरोबरी साधली. ब्राझीलियन जुवाव व्हिक्टर याने 48 व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर अचूक नेम साधला. 51व्या मिनिटास हालिचरण नरझरी याच्या गोलमळे हैदराबादच्या खाती 2-1 अशी आघाडी जमा झाली.

68 व्या मिनिटास स्कॉटलंडचा ग्रेग स्टुअर्ट याच्या गोलमुळे मुंबई सिटीने आघाडी साधली. जुवाव व्हिक्टरने 76 व्या मिनिटास हैदराबादला पुन्हा 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. 85 व्या मिनिटास बदली खेळाडू स्पेनचा अल्बर्टो नोगेरा याच्या गोलमुळे मुंबई सिटीस 3-3 अशी गोलबरोबरीसह एक गुण मिळविता आला. या लढतीत दोन्ही संघांच्या बचावफळीचा चांगलाच कस लागला.

एटीके मोहन बागान-चेन्नईयीन लढत आज

कोलकाता येथे सोमवारी एटीके मोहन बागान व चेन्नईयीन एफसी यांच्यात आयएसएल फुटबॉल सामना खेळला जाईल. विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगणावर हा सामना होईल. उभय संघांत आतापर्यंत स्पर्धेत चार सामने झाले आहेत. एटीके मोहन बागानने दोन लढतीत विजय नोंदविले, तर दोन सामने बरोबरीत राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT