ISL.jpg 
क्रीडा

आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी पुन्हा गोव्याचे वेध

दैनिक गोमंतक

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल स्पर्धेचा (Football Tournament) आगामी आठवा मोसम पुन्हा एकदा गोव्यातच (Goa) जैव सुरक्षा वातावरणात खेळविण्याचे संकेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेचे आयोजक फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) (FSDL) धोका पत्करण्यास तयार नाहीत. 2020-21 मोसमातील आयएसएल स्पर्धा गोव्यातील तीन स्टेडियमवर जैवसुरक्षा वातावरणात सूरळीत आणि यशस्वी ठरली होती, आता त्याच पार्श्वभूमीवर गोव्यात आणखी एक मोसम खेळविण्यास आयोजकांनी प्राधान्य दिले आहे. सारं काही नियोजनानुसार ठरल्यास, 2021-22 मोसमात आयएसएल स्पर्धा नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर, बांबोळी येथील जीएमसी स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदानावर खेळली जाईल.

गतमोसमात आयोजकांनी सहभागी संघांसाठी निवास आणि सराव मैदानाची व्यवस्था पाहिली होती, यंदा ती जबाबदारी संबंधित संघांना उचलावी लागण्याची शक्यता आहे.  2020-21 साखळी गुणतक्त्यानुसार फातोर्डा येथे मुंबई सिटी, एटीके मोहन बागान, नॉर्थईस्ट युनायटेड, बांबोळी येथे एफसी गोवा, हैदराबाद एफसी, जमशेदपूर एफसी, बंगळूर एफसी, तर वास्को येथे चेन्नईयीन एफसी, ईस्ट बंगाल, केरळा ब्लास्टर्स, ओडिशा एफसी यांच्यासाठी होम ग्राऊंड असेल. 

दहा संघांत स्पर्धा?

गतमोसमात आयएसएल स्पर्धेत 11 संघ होते. सध्या ईस्ट बंगाल व त्यांचे गुंतवणूकदार श्री सिमेंट  यांच्यात करारावरून बिनसले नाही. प्रश्न सुटला नाही, तर कदाचित आयएसल स्पर्धा ईस्ट बंगालविना दहा संघांत खेळली जाऊ शकते.

तर स्पर्धा आखातात

देशात कोरोना विषाणू महामारीची तिसरी लाट येण्याचे अंदाज आहेत, तसे झाल्यास आयएसएल स्पर्धा देशाबाहेर आखातातील देशात खेळविण्याचा निर्णय आयएसएल आयोजक घेऊ शकतात. कतार किंवा संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे स्पर्धा होऊ शकते, पण तो अंतिम पर्याय असल्याचे वृत्त आहे.
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT