Ishaan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

कोण मोडणार युवराज सिंगच्या 6 षटकारांचा विक्रम? ईशान किशनने दिलं उत्तर

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मेगा लिलावात ईशान किशनवर मोठी बोली लावण्यात आली. परंतु,लिलावानंतर खेळलेल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याची खराब कामगिरी पाहायली मिळाली. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-20 मालिकेतील 3 सामन्यांत केवळ 71 धावा केल्या. त्यातच आता श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) मालिकेत त्याला आपल्या कामगिरीचा हा आलेख सुधारायचा आहे. यात ईशान कितपत यशस्वी होतो, हे 24 फेब्रुवारीपासूनच सर्वांनाच समजेल. परंतु त्याआधी त्याने अशाच 5 रंजक प्रश्नांची उत्तरे दिली, ज्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे प्रश्न ईशानच्या (Ishaan Kishan) क्रिकेट कारकिर्दीशी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहेत. (Ishan Kishan Answered 5 Interesting Questions)

दरम्यान, युवराज सिंगचा (Yuvraj Singh) 6 षटकारांचा विक्रम कोण मोडणार? तुला कोणत्या गोलंदाजाची सर्वाधिक भीती वाटते? ईशान किशनने एसजीटीव्हीच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. चला तर मग एक नजर टाकूया ते 5 प्रश्न आणि त्याची उत्तरे...

ईशान किशनला 5 प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न- लहानपणापासून कोणत्या फलंदाजाने तुझ्यावर सर्वात जास्त प्रभाव टाकला आहे?

ईशान - ब्रायन चार्ल्स लारा. मला त्याची फलंदाजी खूप आवडली. त्याच्या खेळातील आत्मविश्वास पहिल्या चेंडूपासून दिसून येत होता. डावखुरा फलंदाज म्हणून तो स्टायलिश फलंदाज होता.

प्रश्न- ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि तु… कोण आहे जो युवराज सिंगचा 6 षटकारांचा विक्रम मोडू शकेल?

ईशान- बरं आम्ही तिघेही त्यासाठी लायक आहोत. पण मला वाटतं हार्दिक पंड्या. कारण तो खूप शक्तिशाली असून तो कोणत्याही मैदानावर षटकार ठोकू शकतो.

प्रश्न- कोणत्या गोलंदाजाची बॉलिंग खेळण्यासाठी अधिक कठीण आहे?

ईशान- जोफ्रा आर्चर, त्याच्या उंचीमुळे. त्याची धावगती संथ आहे मात्र जर त्याने वेगवान गोलंदाजी केली तर ते थोडे कठीण आहे.

प्रश्न- तु क्रिकेटर नसता तर?

ईशान- मी राजकारणात आलो असतो कारण त्याद्वारे मी लोकांना मदत करु शकतो.

प्रश्न- धोनीचा तुझ्यावर किती प्रभाव आहे?

ईशान- खूप... तो खूप मनमिळाऊ आहे. मदतीसाठी तो सदैव तत्पर असतो. त्याने आम्हा सर्वांची काळजी घेतली. आम्ही नेटवर जायचो तेव्हा सराव सत्रात काय करायचं, कशावर लक्ष केंद्रित करायचं हे तो सांगत असे. त्यामुळे युवा खेळाडू असल्याने त्याच्याकडून खूप काही शिकायला भेटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LDC Recruitment Scam: 'पुरावे एकत्र करण्याचे काम सुरूच'; मोन्सेरात यांच्या मागणीवर सरदेसाईंचे प्रत्युत्तर

Bandra - Madgaon Express: कोकणासाठी रेल्वे मागतोय तुम्ही गोव्यासाठी देताय? वांद्रे-मडगाव एक्सप्रेसबाबत कोकणवासीय नाराज

Goa Today's News Live: ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार

Curchorem News: सरकारचा ‘कचरा तुमच्या दारी’ उपक्रम सुरु; कुडचडे कचरा समस्येवरुन अमित पाटकर यांचा टोला

खरी कुजबुज: नोकऱ्या कोणाला मिळतात?

SCROLL FOR NEXT