Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw: गुपित फुटलं! शॉचं गुपचूप लग्न? व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशीच मोठा खुलासा

पृथ्वी शॉने इंस्टाग्राम स्टोरीवर केलेल्या पोस्टने खळबळ उडाली असून त्याने लग्न केले आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Pranali Kodre

Valentine's Day 2023: भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या मैदानातील कामगिरीमुळे नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे मॉडेल आणि अभिनेत्री निधी तापडियाबरोबर अफेअर सुरू असल्याची चर्चा होती. त्यातच आता शॉच्या एका इंस्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या नात्याची पुष्टी जवळपास झाली आहे.

मंगळवारी (14 फेब्रुवारी) जगभरात व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जात आहे. या प्रेम व्यक्त करण्याच्या दिवशीच शॉने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये निधी आणि तो दिसत आहेत.

तसेच त्याने या फोटोवर 'बायकोला व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा' (हॅपी व्हॅलेंटाईन्स माय वायफी) अशा अर्थाचे कॅप्शन टाकले होते. निधीने यापूर्वी लोकप्रिय मालिका सीआयडीमध्ये काम केले आहे.

पण त्याने ही पोस्ट काही शेअर केल्यानंतर काही मिनिटातच डिलीट केली. पण तोपर्यंत अनेक युजर्सने त्याच्या या पोस्टचा स्क्रिनशॉट घेतला होता. त्यामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, शॉने त्याच्या पोस्टवर निधीचा बायको असा उल्लेख केला असल्याने अनेकांना प्रश्न पडला की त्याने लग्न केले आहे का? आणि केले असेल, तर कधी केले. त्याला याबद्दल क्रिकेट चाहत्यांकडून प्रश्नही विचारले जात आहेत.

शॉ जवळपास दीड वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, मालिकेतील एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले नाही.

शॉ याने भारताकडून अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध 25 जुलै 2021 रोजी खेळला होता. हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच टी20 सामनाही होता.

दरम्यान, तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या काही महिन्यात मुंबईकडून खेळताना देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याने गेल्याच महिन्यात आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात 379 धावांची त्रिशतकी खेळी केली होती.

दरम्यान, शॉ आता आयपीएल 2023 हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल. या हंगामात तो किंवा डेव्हिड वॉर्नर या संघाचे नेतृत्व करतानाही दिसू शकतात. कारण दिल्लीचा नियमित कर्णधार ऋषभ पंत सध्या दुखापतींमधून सावरत आहे. त्याचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस कार अपघात झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT