IPL2021 BCCI approves bubble to bubble transfer
IPL2021 BCCI approves bubble to bubble transfer 
क्रीडा

IPL2021: ‘बबल-टू-बबल’ ट्रान्सफरसाठी बीसीआयने दिली मान्यता

गोमंतक वृत्तसेवा

नवी दिल्ली: (IPL2021 BCCI approves bubble to bubble transfer) आगामी इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) च्या आगामी हंगामापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)  'बबल-टू- बबल ट्रान्सफर' करण्यासाठी मान्यता दिला आहे. बीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनानंतर आता, भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या मालिकेचा भाग असणारे खेळाडू क्वारंटाइन न राहता आयपीएलच्या बायो-बबलमध्ये राहू शकतात.

बीसीआयने म्हटले, ‘’भारत-इंग्लंड मालिकेमधील खेळाडू थेट आयपीएलच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करु शकतात. फ्रेंचायझींना त्यांना थेट बस हॉटेल आणि चार्टर्ड प्लाइट्सद्वारे टीम हॉटेलमध्ये नेण्याची व्यवस्था करावी लागेल. जर चार्टर्ड उड्डाणे असतील तर इतर सदस्यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.’’

बीसीआयने असेही म्हटले हे की, जर खेळाडूंनी कोरोना नियमांचे योग्य पालन केल्याचे आढळून आल्यास तर ते खेळाडू आरटीपीसीआर चाचणी आणि क्वारंटाइनच्या नियमांच्य़ा शिवाय थेट बायो- बबलमध्ये प्रवेश करु शकतात. बीसीआयच्या या निर्णयांचा फायदा पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेमध्ये सहभागी असणाऱ्या खेळाडूंना होणार आहे. जर फ्रेचांयझीने त्या खेळाडूंना थेट चार्टर्ड विमानाने भारतात आणल्यास त्यांना क्वारंटाइन नियंमापासून मुक्तता मिळाणार आहे. (IPL2021 BCCI approves bubble to bubble transfer)

आगामी आयपीएलसाठी एकूण बारा बायो-बबल तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी आठ बायो-बबल फ्रेंचायीझ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. दोन बायो-बबल सामना अधिकारी आणि सामना व्यवस्थापकांसाठी असणार आहे. तर इतर दोन बबल प्रसारण समालोचकांसाठी असतील.

बीसीआयने पुढे ही म्हटले की, त्याचे अधिकारी आणि ऑपरेशन टीम कोणत्याही बायो- बबलचा भाग असणार नाहीत. यामुळे बीसीआयचे अधिकारी खेळाडू, टीम सपोर्ट स्टाफ, मॅच मॅनेजमेंट टीम हे वैयक्तिकरित्या संपर्क साधू शकणार नाहीत. कोरोनाच्य़ा पाश्वभूमीवर आयपीएलच्या हंगामाची सुरुवात पुढील महिन्यात 9 एप्रीलपासून होणार आहे. सहा शहरांमध्ये आयपीएलची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

Theft In Bodgeshwar Temple: बोडगेश्वर मंदिरात पुन्हा मोठी चोरी; फंडपेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

SCROLL FOR NEXT