RR vs SRH Dainik Gomantak
क्रीडा

प्रतिक्षा संपली! जो रुटने केले IPL मध्ये पदार्पण; पाहा राजस्थान - हैदराबादची Playing XI

RR vs SRH: आयपीएल 2023 मध्ये 52 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे.

Pranali Kodre

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होत आहे. हा सामना राजस्थानच्या घरच्या मैदानावर म्हणजेच सवाई मानसिंग स्टेडियमवर होत आहे. हा या स्पर्धेतील 52 वा सामना आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत. राजस्थानकडून जो रुटचे पदार्पण झाले आहे. त्यामुळे रुट पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर हैदराबाद संघाकडून विवरांत शर्माने पदार्पण केले आहे. तसेच ग्लेन फिलिपलाही या सामन्यासाठी संधी मिळाली असून हॅरी ब्रुकला संघातून वगळण्यात आले आहे.

या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने कर्णधार एडन मार्करमव्यतिरिक्त हेन्रिक क्लासेन, ग्लेन फिलिप आणि मार्को यान्सिन या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तसेच राजस्थानने जोस बटलर, जो रुट आणि शिमरॉन हेटमायर या परदेशी खेळाडूंला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

त्यामुळे हैदराबादने प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 परदेशी खेळाडूंना संधी दिल्याने त्यांना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ भारतीय खेळाडूला वापरता येणार आहे, तर राजस्थान मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये तीनच परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय किंवा परदेशी खेळाडूला वापरू शकतात.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राजस्थानने राखीव खेळाडूंमध्ये देवदत्त पडिक्कल, ऍडम झम्पा, रियान पराग, जेसन होल्डर आणि ओबेड मॅकॉय यांना संधी दिली आहे, तर हैदराबादने हॅरी ब्रुक, अनमोलप्रीत सिंग, मयंक डागर, नितीश रेड्डी आणि सनवीर सिंग यांना राखीव खेळाडूंमध्ये निवडले आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल

  • सनरायझर्स हैदराबाद - अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को यान्सिन, विवरांत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT