Mumbai Indians VS KKR Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Ian Williams Langford British Citizen Mumbai: आयपीएल 2026 चा थरार सध्या देशभर सुरु असतानाच क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक बातमी समोर आली.

Manish Jadhav

IPL 2026 Broadcast Engineer Death: आयपीएल 2026 चा थरार सध्या देशभर सुरु असतानाच क्रिकेट वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक बातमी समोर आली. आयपीएल सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा मुंबईत मृत्यू झाला. या घटनेमुळे आयपीएलच्या गराड्यात दुःखाची लाट पसरली असून बीसीसीआय आणि क्रिकेट प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. इयान विल्यम्स लँगफोर्ड असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे ब्रिटीश नागरिक होते. आयपीएलच्या तांत्रिक टीमचा महत्त्वाचा भाग म्हणून ते गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, इयान विल्यम्स लँगफोर्ड हे आयपीएल 2026 च्या सामन्यांच्या कव्हरेजसाठी 24 मार्चपासून मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध ट्रायडेंट हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर अटीतटीचा सामना पार पडला. हा सामना संपल्यानंतर इयान आपल्या हॉटेलमधील खोली क्रमांक 2715 मध्ये परतले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी सकाळी जेव्हा हॉटेलच्या रिसेप्शनवरुन त्यांच्या खोलीत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अनेक वेळा फोन करुनही उत्तर न मिळाल्याने हॉटेल प्रशासनाला शंका आली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहण्याचे ठरवले.

हॉटेल (Hotel) कर्मचाऱ्यांनी इयान यांच्या खोलीचे दार वाजवले, पण आतून काहीच हालचाल जाणवली नाही. अखेर मास्टर चावीचा वापर करुन खोली उघडण्यात आली असता, इयान विल्यम्स लँगफोर्ड हे जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. हॉटेलच्या इन-हाऊस डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, मात्र तपासणीनंतर त्यांनी इयान यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणी 'अपघाती मृत्यू' (ADR) म्हणून नोंद केली असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा सखोल तपास सुरु आहे.

ब्रॉडकास्ट इंजिनिअर म्हणून इयान यांचे योगदान महत्त्वाचे होते, कारण त्यांच्यासारख्या तंत्रज्ञांमुळेच जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांना घरात बसून आयपीएलचा आनंद घेता येतो. एका परदेशी तंत्रज्ञाचा अशा प्रकारे अचानक झालेला मृत्यू ही बीसीसीआयसाठी देखील चिंतेची बाब ठरली आहे. सध्या पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करत असून पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे आयपीएल 2026 च्या उत्साहावर विरजण पडले असून क्रीडा विश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Job Scam: 'GMC'मध्ये नोकरीचं स्वप्न दाखवलं अन् तिघांना लुबाडलं; फोंडा पोलिसांकडून डिचोलीतील संशयिताला बेड्या

Mangal Gochar 2026: मंगळाचा भरणी नक्षत्रात धमाका! 3 राशींच्या नशिबात सुवर्णकाळाची पहाट; धनाचा होणार वर्षाव

Zilla Panchayat Goa: कामं अर्धवट ठेवणारे कंत्राटदार 'ब्लॅकलिस्ट' होणार! दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचा कडक इशारा

Bison Attack : दिनेश गावडेवर गव्याकडूनच हल्ला! वन खात्याचा दावा फेटाळला: घटनास्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Explainer: उर्जेपासून तंत्रज्ञानापर्यंत... जागतिक पटलावर भारताचा 'मास्टरस्ट्रोक'! 5 देशांच्या दौऱ्यातून PM मोदी साधणार विकासाचं 'पॅकेज'

SCROLL FOR NEXT